1. बातम्या

विलक्षण! या जिल्ह्यात तब्बल सहा हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन लागवड, जाणून घेऊ सविस्तर परिस्थिती

गेल्यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरिपातील सगळ्यात महत्त्वाची पिकांचे अतोनात नुकसान झाले.अगदी कापूस असो की सोयाबीन हे खरिपातील महत्त्वाची पिके मातीमोल झाली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soyabioen crop

soyabioen crop

गेल्यावर्षी  संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरिपातील सगळ्यात महत्त्वाची पिकांचे अतोनात नुकसान झाले.अगदी कापूस असो की सोयाबीन हे खरिपातील महत्त्वाची पिके मातीमोल झाली.

त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जर सोयाबीन पिकाचा विचार केला तर या अतिवृष्टीचा फटका सोयाबीनला बसल्याने त्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे सोयाबीनला यावर्षी चांगला भाव मिळाला. परंतु खरीप हंगामात झालेले सोयाबीनचे नुकसान भरून काढण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांनी चक्क उन्हाळी सोयाबीन लागवड करायचे ठरवले व त्यादृष्टीने लागवड केली. 

परंतु उन्हाळ्यामध्ये सोयाबीन एक चांगली येईल की नाही याची एक भीती होती. परंतु आता सोयाबीन पिकाला फळधारणा होऊन शेंगा धरण्यास सुरुवात झाली आहे.

 उन्हाळी सोयाबीन लागवडीमध्ये नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर एकट्या नांदेड जिल्ह्यात सहा हजार हेक्‍टरवर उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली आहे. यावर्षी पावसाने वर्षभर पावसाने  पाठ सोडली नाही. खरीप हंगामामध्ये नेमकी  सोयाबीन काढणी चा वेळ असतांना पाऊस पडल्याने सोयाबीन पीक वाया गेले.

अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याने सोयाबीनला चांगला भाव मिळाला. त्यामुळे उन्हाळी सोयाबीन ला देखील चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात तब्बल सहा हजार हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाली आहे. उन्हाळी सोयाबीन चांगलेच बहरले असून त्याला आता शेंगा लागण्यास  सुरुवात झाली आहे.

English Summary: 6000 hecter area cultivation in nanded district of summer soyabioen crop Published on: 31 January 2022, 10:12 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters