सध्या राज्यात एका मोठ्या प्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडे एमआयडीसीमध्ये (Talegoan-Dabhade MIDC) हा प्रकल्प उभा राहणार होता.मात्र आता तो गुजरात मध्ये जाणार असल्याची बातमी कळताच राज्यात संतापाची लाट पसरली आहे. यामुळे सरकारवर टीका केली जात आहे.
या निर्णयामुळे तळेगाव परिसरात अस्वस्थता पसरली आहे. हा प्रकल्प परत आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. असे असताना आता याबाबत अधिकची माहिती समोर आली आहे. येथील जमीन फॉक्सकॉन - वेदांताला देऊ करण्यात आली होती. मावळमधील आंबळे, निगडे, कल्हाट आणि पवळेवाडी शिवारातील सुमारे 6000 एकर जमीन टप्पा चार साठी संपादित करण्यात येत आहे.
ही संपादन प्रक्रिया गेल्या चार वर्षांपासून सुरू असून शेतकऱ्यांच्या सातबारावर एमआयडीसीचा शिक्का देखील पडलेला आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात मोबदला देखील देण्यात आला आहे. मात्र अचानक हा निर्णय का बदलला याबाबत आता चर्चा सुरु आहे. याबाबत काही राजकारण आहे का ते महाराष्ट्रासाठी चांगले नसल्याचे अनेकांचे म्हणने आहे.
थारला टक्कर देण्यासाठी मारुती जिमनी लवकरच लॉन्च, किंमतही आपल्या बजेटमध्ये..
दरम्यान, संपादित करण्यात येत असलेल्या एकूण जमिनीपैकी सुमारे 1000 एकर जमीन फॉक्सकॉन - वेदांताला देण्याचं राज्य सरकारने कबूल केलं होतं. त्याशिवाय गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन म्हणून अनेक प्रकारच्या सवलती तसेच सुविधा राज्य सरकारने देऊ केल्या होत्या. असे असताना आता हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ब्रेकिंग! माजी मंत्री बच्चू कडू यांना धक्का, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यामध्ये एक लाख 54 हजार कोटींची गुंतवणूक येणार होती. प्रकल्प उभा राहिल्यानंतर सुमारे दोन लाख लोकांना रोजगार मिळणार होता. यामुळे याचा मोठा फायदा राज्यातील तरुणाना होणार होता. येथील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचे महत्व पटल्यानंतर त्यांनी स्वतःहून जमिनी देऊन केल्या होत्या. मात्र आता सगळ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.
महत्वाच्या बातम्या;
lumpy disease: लम्पीचे थैमान! कृषीमंत्र्यांच्या तालुक्यात अनेक जनावरांचा मृत्यू, वाचा महाराष्ट्रातील परिस्थिती..
द्राक्ष आणि डाळिंब पीक परिसंवादाचे आयोजन, शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन..
शेतकऱ्यांना दिलासा! पीक नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार..
Share your comments