दिघी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग गु्रप (बीईजीच्या) हद्दीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 50 हजार झाडांची लागवड (Plantation of trees) करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी येणार्या 2 कोटी खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील (Administrator Rajesh Patil) यांनी स्थायी समितीने काल (19 जुलै) मंगळवारी मंजुरी दिली.
यासह 21 कोटी 46 लाख खर्चाच्या विविध विषयांना मान्यता देण्यात आली. दिघीतील बीईजीच्या हद्दीत पालिका 50 हजार झाडे लावणार आहे. त्या झाडांची 2 वर्षांसाठी देखभाल व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाच्या वन विकास महामंडळाकडे (Forest Development Corporation) सोपविण्यात आले आहे. यासाठी 1 कोटी 96 लाख खर्च अपेक्षित आहे असे सांगितले आहे.
पालिकेच्या इ क्षेत्रीय विद्युत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रस्तावित मोशी उप-अग्निशमन केंद्र (Sub-Fire Station) येथे अग्निशमन संबंधित विद्युत विषयक कामे करण्यासाठी येणार्या 73 लाख रुपये खर्चास तसेच, विविध इमारतींमधील फायर अलार्म व फायर फायटिंग यंत्रणेची वार्षिक पद्धतीने देखभाल व दुरुस्तीसाठी 50 लाख इतका खर्च अपेक्षित आहे.
'या' योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका; अन्यथा बसेल मोठा फटका
आकुर्डी गुरुद्वारा चौकापासून ते राजयोग कॉलनीपर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 7 कोटी 10 लाख खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास आयुक्तांनी मंजुरी दिली. पालिकेच्या कायदा विभागाकडील विधी अधिकार्यांची मानधनावर सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.त्या खर्चास मान्यता देण्यात आली.
तसेच घनकचरा ट्रान्सफर स्टेशनसाठी 9 कोटी 38 लाख शहरात घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन (Transfer Station) उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक मशिनरी व विद्युतविषयक कामे करण्यासाठी 9 कोटी 38 लाख खर्च आहे. यास आयुक्तांनी मंजुरी दिली.
'या' योजनेच्या 'ई-केवायसी' चे सर्व्हर डाउन ; शेतकऱ्यांवर ई-सेवा केंद्रांवर हेलपाटे मारण्याची वेळ
Share your comments