1. बातम्या

Crime News : बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सराफ व्यावसायिकाकडे ५० लाखांची मागणी; भिगवणमधील प्रकार

सराफ व्यावसायिकांच्या मुलाला गंभीर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात उघडकीस आला आहे. याबाबत २ आरोपी विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

Crime News

Crime News

Indapur News : सराफ व्यावसायिकांच्या मुलाला गंभीर गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात उघडकीस आला आहे. याबाबत २ आरोपी विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुंदर कुसाळकर (वय ४०) आणि त्याची साथीदार पल्लवी जीवन चांदगुडे (वय २८) अशी आरोपींची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी सराफ व्यावसायिक यांच्याकडे तुमच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगून ५० लाख रुपयांची खंडणी मागीतली होती. याबाबत फिर्यादी पिसाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपींनी ६ लाख रुपये स्वीकारल्याचीही माहिती दिली आहे. भिगवण शहरात पिसाळ यांचा सराफ व्यवसाय आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा त्यांना व्यवसाय मदत करतो.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुंदर कुसाळकर आणि पल्लवी चांदगुडे यांनी पिसाळ यांना फोन करुन तुमचा मुलगा आकाश यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा दाखल होणार आहे. जर यातून तु्म्हाला सुटका करायची असेल तर ५० लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली. समाजातील प्रतिष्ठा आणि बदनामीच्या भीतीने पिसाळ यांनी आरोपी कुसाळकर आणी पल्लवी चांदगुडे यांना वेळोवेळी ६ लाख रुपये रोख स्वरूपात रक्कम दिली. मात्र तरीही आरोपी यांनी वेळोवेळी धमकी देत आरोपी यांची फिर्यादी यांच्या मुलाबाबत असणारी आक्षेपार्ह व्हिडीओ फोटो चित्रण व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाख रुपये मागितले. यामुळे सततच्या धमकीला कंटाळून पिसाळ यांनी भिगवण पोलीस ठाण्यात धावू घेऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, आरोपी कुसाळकर आणि पत्रकार पल्लवी चांदगुडे हे शहरातील अनेकांना ब्लॅकमेल करत असल्याची चर्चा शहरात आता रंगू लागली आहे. तसंच भिगवण शहर परिसरात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मासेमारी आणि मत्स्यपालन करणाऱ्यांकडेही त्यांनी पैसे मागितल्याची चर्चा होत आहे.यामुळे आता भिगवण पोलिसांनी खंडनी गुन्ह्यांची नोंद करित तपास सुरु केला आहे. सदर गुन्ह्यांचा तपास पीएसआय जाधव करित आहेत.

English Summary: 50 lakhs demanded from Saraf businessman for not filing a serious case Published on: 26 October 2023, 12:57 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters