महाराष्ट्रात द्राक्षे शेती खुप मोठ्या प्रमाणात केली जाते, महाराष्ट्रातील एकूण द्राक्षे उत्पादनात 70 टक्के उत्पादन हे एकट्या नाशिक जिल्ह्यातून मिळते. नाशिक जिल्ह्याचा द्राक्षे उत्पादनात एवढा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच नाशिक जिल्ह्याला वाईन सिटी (Wine City) म्हणुन संबोधले जाते. पण ह्यावर्षी चित्र बदलले आहे,अलीकडे पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षे बागांचे (Grape Vineyards) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यात जवळपास 1.75 लक्ष एकरावर द्राक्षे लागवड केली गेली आहे. ह्या एवढ्या मोठ्या क्षेत्रापैकी जवळपास 50 टक्के क्षेत्र हे पावसामुळे प्रभावित झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक द्राक्षे बागाची छाटणी ही उरकली गेली आहे व द्राक्षे बागा आता नवीन पालवी फोडण्यास सज्ज झाल्या आहेत. द्राक्ष उत्पादकांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघाच्या (Maharashtra Rajya Drakash Bagayatdar Sangh) मते, 80,000 एकरवरील द्राक्षबागांचे उत्पादन 20% ने कमी होणार आहे. जिथे सामान्य काळात एकरी 8 टनांच्या उत्पादन मिळायचे तिथे हे 6 टनवर पोहचण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ, अतिवृष्टीमुळे सुमारे 2 लाख टन द्राक्षांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठया प्रमाणात नुकसान होणार आहे.
महाराष्ट्र राज्य द्राक्षे बागायतदार संघ (Maharashtra Rajya Drakash Bagayatdar Sangh) वरिष्ठ पदाधिकारी माणिक पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील 50% पेक्षा जास्त द्राक्ष पिकाला नवीन पालवी फुटण्याला सुरवात झाली होती आणि यापैकी काही द्राक्षबागांमध्ये द्राक्षे हळूहळू विकसित होऊ लागली होती. परंतु पावसाने द्राक्ष बागांचे खूप नुकसान केले आहे आणि यामुळे द्राक्षांचे उत्पादन कमी होईल.
माणिक पाटील, जे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड (National Horticulture Board) आणि द्राक्ष निर्यातदार संघ (Grapes Exporters Association of India) चे देखील संचालक आहेत, ते बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांना डाउनीसारख्या रोगापासून वाचवण्यासाठी फवारणी करायला सुरवात करून दिली आहे.
पाटिल ह्यांनी पुढे बोलताना सांगितले की,ज्या द्राक्ष बागांची अजून छाटणी बाकी आहे तेथे ह्या पाऊसामुळे कोणतेही नुकसान होणार नाही आणि त्या शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे काही कारण नाही. असे असले तरी द्राक्षे उत्पादनात ह्यावर्षी खुप मोठ्या प्रमाणात घट घडणार आहे आणि त्यामुळे द्राक्षे उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत येण्याचे चित्र दिसत आहे.
Source TOI
Share your comments