महाराष्ट्रात यावर्षी ऊस उत्पादन मोठया प्रमाणात असल्याने हंगाम २०२१-२२ मध्ये साखरेचे उत्पादन मोठया प्रमाणावर होणार आहे. राज्यात उसाचा हंगाम जोरदार सुरु आहे. यंदा राज्यातील साखर कारखान्यांनी नवे रेकॉर्ड बनवले आहे.
राज्यातील १८७ साखर कारखान्यांपैकी तब्बल ६७ कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. यामध्ये १०० टक्क्यांहून जास्त एफआरपी देणाऱ्या पहिल्या दहा कारखान्यांतील एकाच जिल्ह्यातील पाच कारखान्यांचा समावेश आहे.
राज्यातील साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू झाला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पारदर्शकपणे राज्यातील साखर कारखान्यांची एफआरपी देण्याची आर्थिक सक्षमता समजावी, या हेतूने साखर आयुक्त कार्यालयाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यात ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी दिलेले ३१, ६० ते ८० टक्के एफआरपी दिलेले ३४, तर ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी दिलेल्या ५५ कारखान्यांचा समावेश आहे.
या जिल्ह्यातील कारखान्यांची बाजी
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांची बाजी मारली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला गेला आहे. यापैकी तीन खासगी, तर दोन सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. बिद्री- कागल, मंडलिक- हमीदवाडा, जवाहर- हुपरी, राजाराम- बावडा, गुरुदत्त- टाकळी, इको-केन- चंदगड, दत्त-दालमिया- पोर्ले तर्फ आसुर्ले, सरसेनापती- सेनापती कापशी या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली आहे.
या हंगामात रुपयाही न दिलेल्या कारखान्यांत पुणे, जालना, जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी एक; तर सातारा, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन कारखान्यांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात रुपयाही न दिलेल्या कारखान्यांत पुणे, जालना, जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी एक; तर सातारा, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन कारखान्यांचा समावेश आहे. राज्यातील ११ कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील एफआरपीची दमडीही शेतकऱ्यांना दिली नसल्याचे साखर आयुक्तालयाच्या अहवालातून स्पष्ट होते.
Share your comments