१.राज्यातीस तापमानात वाढ,थंडी कमी
२.हिरव्या बेदाण्याला मिळतोय १२० ते १४० दर
३.कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याची तस्करी सुरू
४.राज्यातील ११ कृषी हवामान केंद्र बंद होणार
५.पीएम किसान चा १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात
१.राज्यातीस तापमानात वाढ,थंडी कमी
राज्यातील वातावरणात बदल झाल्याच पाहायला मिळत आहे. तसंच पावसाला देखील पोषक वातावरण तयार असल्याने तापमानात वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना आता गरमीला सामोरे जावे लागत आहे. पुढील २४ तासांमध्येसुद्धा मराठवाडा आणि विदर्भावर पावसाचं संकट निर्माण झालं आहे. तर काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे आता संकटाचा डोंगर उभा राहिला आहे.उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सूर्यप्रकाश देखील राज्यात आता सर्वत्र दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातूनही आता थंडीनं दडी मारली आहे. यामुळे तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. ठाणे आणि मुंबईतही तापमानाचा आकडा वाढत असून ठाण्यामध्ये दिवसाचं तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचू लागला आहे.देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कहर कमी होऊ लागला आहे. फेब्रुवारीपासून थंडी कमी झाली असून तापमानातही वाढ होत आहे. आज देशाच्या बहुतेक भागांमध्ये किमान तापमान ७-१२ डिग्री सेल्सियस दरम्यान आहे. तसेच, उत्तर-पश्चिम भारताच्या अनेक भागांमध्ये आणि उत्तर मैदानी प्रदेशांसह त्याच्या आसपासच्या भागात तापमान सामान्यपेक्षा २-४ अंश सेल्सिअस कमी राहू शकते.
२.हिरव्या बेदाण्याला मिळतोय १२० ते १४० दर
शेतकऱ्यांसाठी शेती करणे अवघड होऊ लागली आहे. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस यामधून सुटल्यानंतर चांगले उत्पादन आल्यास शेतमालास दर मिळत नाहीराज्यात आता बेदाणा निर्मीती सुरू झाली आहे दरवर्षी फेब्रुवारी पासुन सुरू होणारा हंगाम यंदा जानेवारीतच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.सांगली जिल्ह्यातील बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मिती होत असते .त्यासोबत सोलापूर, इंदापूर, उस्मानाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर बेदाणा निर्मिती होते.यंदा अवकाळीचा फटका हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे यंदा द्राक्ष मण्यांत गोडी भरताना मण्याला तडे जात आहेत.घडात बुरशी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.यामुळे व्यापाऱ्यांनी घेतलेल्या बागा सोडून दिल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर बेदाणा निर्मिती शिवाय कोणताच पर्याय राहिला नाही. त्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीपासूनच बेदाणा निर्मिती सुरू झाली आहे. पण, द्राक्षात पुरेशी गोडी नसल्यामुळे हलक्या दर्जाचा बेदाणा तयार होत आहे.यावर्षी जानेवारीपासूनच बेदाणा निर्मिती सुरू झाल्याने सध्या हिरव्या बेदाण्याला शेतकऱ्यांना सरासरी १२० ते १४० रुपये किलो दर मिळत आहे. मार्चअखेर हंगाम सुरू राहून सरासरीइतका बेदाणा उत्पादन होण्याचा अंदाज असणार आहे.
३.कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याची तस्करी सुरू
द्राक्ष,डाळिंब,टोमॅटोच्या बॉक्समधून सद्या कांदा तस्करी होत असल्याच पाहायला मिळत आहे.केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यातबंदी लादली असताना देखील काही निर्यातदार आता कांद्याची तस्करी करत आहेत. यातून ते एका कंटेनरमागे १५ ते १६ लाख रुपये निव्वळ नफा कमावत असुन मात्र याचा सामान्य कांदा उत्पादकांना काहीही लाभ होत नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा निर्यात संघटनेनं केली आहे.निर्यातबंदी असतानाही परदेशात कांदा तस्करी होत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना तसंच स्थानिक ग्राहकांना देखील होत नाही; त्यामुळे केंद्र सरकारनं त्वरित निर्यात सुरू करून दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतील याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा यांनी केली.भारतातील शेतकरी ८ ते १० रुपये किलोने कांदा विकत आहे आणि हा कांदा तस्कर बाहेरील देशात दोनशे रुपये किलोनं विक्री करत असून मोठा फायदा मिळवत आहे; त्यामुळे सरकारनं याकडे लक्ष देण्याची गरज असून निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी केली जातेय.
४.राज्यातील ११ कृषी हवामान केंद्र बंद होणार
सद्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे .अवकाळी तर कुठे दु्ष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते.अशात अवकाळी हवामान परिस्थिती आणि हवामानाचा होणारा बदल यापासून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नुकसान कमी करता यावे यासाठी जिल्हास्तरीय कृषी हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळायचा.आता हे सर्व कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. देशातील हे सर्व १९९ केंद्र बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यामुळे देशातील ३० कोटी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जातेय.
५.पीएम किसान चा १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही योजनाद्वारे सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे काम करत आहे.या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य करण्यात येते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १५ हप्ते जमा झाले आहेत तर आता शेतकऱ्यांना १६ व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे.तर मीडीया रिपोर्टनुसार हा हप्ता लकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊ शकतो .आता येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.या फेब्रुवारी अथवा पुढील मार्च महिन्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.लवकरच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळू शकतो.
Share your comments