1. बातम्या

Maharashtra News : राज्यातील महत्त्वाच्या ५ बातम्या, जाणून घ्या एका क्लिकवर

कांद्याचे दर वाढल्याने आता कांदा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील पारगाव येथील दोन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी २५ पिशव्या भरुन ठेवल्या होत्या. मात्र त्याच पिशव्या चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे.

Onion News Update

Onion News Update

१) केंद्र सरकार १६ शहरांमध्ये कांदा विक्री सुरु ठेवणार
देशभरात कांद्याची आवक घटती असल्यामुळे दर वाढलेले आहेत. यामुळे केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, सध्याच्या महागाईला आळा घालण्यासाठी सरकार आपल्या बफर स्टॉकमधून सुमारे १६ शहरांमध्ये कांद्याची विक्री सुरू ठेवणार आहे. सणासुदीत कांद्याची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने आपल्या साठ्यातून साठा सोडण्यास सुरुवात केली आहे. बाजारात कांद्याची मागणी असल्याने अनेक राज्यांमध्ये मागील पंधरवड्यात कांद्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. दिवाळी आधी देखील किरकोळ बाजारात कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

२) कांदा दर वाढल्याने चोरीच्या घटना वाढल्या
कांद्याचे दर वाढल्याने आता कांदा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील पारगाव येथील दोन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी २५ पिशव्या भरुन ठेवल्या होत्या. मात्र त्याच पिशव्या चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. पारगावच्या ढोबळे मळा येथे ही घटना घडली आहे. शेतकरी खंडू सादू ढोबळे यांनी विक्रीसाठी कांदा भरुन ठेवला तो चोरट्यांनी चोरुन नेला आहे. दुसरे शेतकरी अजित बाबाजी ढोबळे यांनी १५ पिशव्या भरून ठेवल्या होत्या. त्या देखील चोरीला गेल्या आहेत.

३) चिखलीत मोकाट जनावरांसाठी गोशाळा होणार
पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या गायी, बैल आदी गोवंशाची संख्या सुमारे ७०० च्या आसपास पोहचली आहे. तसंच काही गोवंश शहरातील रस्त्यांवर देखील पहायला मिळत आहेत. यामुळे अपघात देखील होत आहेत. तसंच काही गोवंश जखमी झाल्यामुळे किंवा आजारी असल्यामुळे संबंधित गोवंशाला उपचाराची आवश्यकता असते. अनेकदा उपचाराअभावी गोवंशाचे मृत्यूचे प्रकार घडतात. यामुळे शहरात गोशाळा होणे गरजेचे आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून पुण्यातील चिखली येथे पाच एकर जागेत गो-संवर्धन केंद्र आणि गोशाळा सुरू करण्यात येणार आहे, असं वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिले आहे.

४) तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ
राज्यात ऑक्टोबर हिटच्या तापमानात घट होत असल्याने थंडीत वाढ होत आहे. असं असलं तरी काही भागात उन्हाची झळ बसत आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे. मुंबईत सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. पण दुपारी मात्र उन्हाचा चटका वाढलेला आहे. यामुळे नागरिकांना काही काळ झळ बसत आहे. काही भागातील तापमान ३५ ते ३६ डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.

५) बीडमध्ये संचारबंदीसह इंटरनेट सेवा बंदचा दुसरा दिवस
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत जास्त जाळपोळीच्या आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेशही त्यांनी जारी केलेत. बीडमधील संचारबंदीसह इंटरनेट बंदचा आजचा दुसरा दिवस आहे. बीड शहरामध्ये झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर २०२३ पर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवली जाणार आहे.

English Summary: 5 important news in the state know in one click Published on: 31 October 2023, 01:50 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters