१.कृषी जागरण KJ चौपालमध्ये ४० शेतकऱ्यांनी घेतला सहभाग
२.५ रुपये दूध अनुदानासाठी गाईंना एअर टॅग करणे गरजेचे, अर्जप्रक्रिया सुरू
३.पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे पुणे जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार
४.दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सज्ज-पालकमंत्री अनिल पाटील
५.२९२ किलो कांद्याचे शेतकऱ्याला मिळाले १२ रूपये
१.कृषी जागरण KJ चौपालमध्ये ४० शेतकऱ्यांनी घेतला सहभाग
कृषी आणि शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवून कृषी क्षेत्रात जास्तीत जास्त सुधारणा करण्यासाठी कृषी जागरण नेहमीच प्रयत्नशील असते. कृषी जागरणमध्ये कृषी क्षेत्रात सक्रिय असलेल्या तज्ज्ञांना शेतीवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले जाते.मात्र,आज शनिवारी चौपाळ येथील कृषी जागरणमध्ये ओडिशा चे४० शेतकरी सहभागी झाले होते. ४० शेतकऱ्यांनी आपला मौल्यवान वेळ आणि अनुभव कृषी जागृतीसोबत शेअर केल्याबद्दल कृषी जागरणचे संस्थापक एम सी डॅामिनिक यांनी आभार मानले.आणि त्यांचा सत्कार केला.
२.५ रुपये दूध अनुदानासाठी गाईंना एअर टॅग करणे गरजेचे, अर्जप्रक्रिया सुरू
गेल्या काही महिन्यांपासून दुधाचे दर कमी झाले असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य भर मोठ्या प्रमाणात आंदोलने पुकारले होते यावर तोडगा काढत शासनाने दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले.त्यातच महाराष्ट्र शासनाने ५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूधपुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे.त्यामुळे या योजनेचा कालावधी ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी आहे.त्यात जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे यांनी केले.या योजनेपासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी जनवारांचे ईअरटॅग करून घेण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.
३.पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे पुणे जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे जिल्ह्यातील शेती, उद्योग, व्यापार, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासोबतच पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात ते बोलत होते.उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणे जिल्हा हा वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील रस्ते, मेट्रो मार्ग, रेल्वे मार्गाद्वारे विकासाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. खोपोली ते खंडाळा मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरातील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांनी या कामांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.श्री.पवार म्हणाले, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यात येत आहे. राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ सुरू केल्याने शेतकरी कुटुंबांना १२ हजार रुपये वार्षिक लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजनेवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील वीज उपकेंद्र आणि वीज वाहिन्यांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा ९४८ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा राज्य समितीकडे सादर करण्यात आला असून ४०० कोटींची अतिरिक्त मागणीही करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
४.दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सज्ज-पालकमंत्री अनिल पाटील
७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना संबोधित करताना पालकमंत्री अनिल पाटील बोललेत .राज्यात व जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सज्ज असून कोणत्याही आपत्तीत शासन जनतेप्रती वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात भीषण टंचाई आणि दुष्काळाचे सावट आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन, प्रशासन जनतेच्या पाठीशी उभे आहे. जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळांपैकी नंदुरबार, शहादा, तळोदा या तीन तालुक्यातील २१ महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून जमीन महसूलात सुट, पिक कर्जाचे पुनर्गठन, शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषि पंपांच्या चालू विजबिलात ३३ पूर्णांक ५ टक्के सुट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ, रोजगार हमी योजनेच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे यासारखे दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेतदु
५.२९२ किलो कांद्याचे शेतकऱ्याला मिळाले १२ रूपये
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.सद्या बाजारात गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. निर्यातबंदीच्या निर्णयापूर्वी चार हजारांवर असणारे कांद्याचे दर आता हजाराच्या खाली आले आहे.त्यातच स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांनी ट्विट केलय.त्यामध्ये त्यांनी एक बिल चा फोटो टाकलाय सोलापुरात शेतकऱ्याला २९२ किलो कांद्याचे १२ रूपये मिळालेत.शेतकऱ्यांची अत्यंत दुर्दशा आहे अस देखील ते ट्विट च्या माध्यमातुन म्हटले.शेतकऱ्याने करायचे काय अस प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
Share your comments