सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरण सध्या चांगलेच तापले आहे. याबाबत माजी आमदार माणिकराव जाधव यांनी अनेक आरोप केले आहेत. सहकार क्षेत्रात मोठा अपहार झाला आहे. एवढेच नाही तर 49 साखर कारखाने हे कायद्याचा भंग करुन खरेदी केले आहेत.आता 20 साखर कारखाने हे दीर्घ मुदतीवर चालवण्यात दिले आहेत. ते सुध्दा भविष्यात हडप करण्याचा राजकीय नेत्यांचा डाव आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
यामुळे राज्य सरकारवर टीका केली जात आहे. याबाबत विधीमंडळात हा मुद्दा चांगलाच गाजला आहे. याबाबत जेष्ठ समाजसेवक (Anna Hajare) अण्णा हजारे यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. यामध्ये चौकशीची मागणी त्यांनी केली होती. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारांना चांगेलच धारेवर धरले.
यामध्ये राज्यातील सहकारी (Sugar Factory) साखर कारखान्यांची कवडीमोल दराने विक्री करुन राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्राला उतरती कळा लावलेली आहे. राज्यातील 15 लाख शेतकऱ्यांचे 49 साखर कारखाने हे (Breach of law) कायद्याचा भंग करुन विक्रीच्या नावाखाली राजकीय नेत्यांनी ताब्यात घेतले आहेत. एवढेच नाही तर यामध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यामुळे सहकार चळवळीला धोका निर्माण झाला असू याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. यावर अजित पवारांनी उत्तर दिले आहे. त्यांनी याबाबतची परिस्थिती सांगितली आहे.
तसेच राज्यातील 36 साखर कारखाने हे सध्या बंद आहेत. राज्यात 106 कारखान्यांचा प्रश्न असून यामध्ये 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. अण्णा हजारे यांच्या तक्रारीची तरी दखल घेणे गरजेचे असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यामुळे यावरून आता विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान होत आहे.
संबंधित बातम्या : 'साखर कारखाना विक्रीत २५ हजार कोटींचा घोटाळा, कारखाने विकत घेणारे सगळे पवारांचे सगेसोयरे'
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केळी पिकाला मिळाला फळ दर्जा, आता 'या' योजनांचा मिळणार लाभ
Share your comments