पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच शेतकरी विरोधी भूमिकेत राहिले आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केला. उसदर आंदोलनात आता त्यांनी देखील उडी घेतली आहे.
रघुनाथदादा म्हणाले, मागील वर्षी गुजरात राज्यात उसाला ४ हजार ७०० रुपये, तर उत्तर प्रदेशात साडेतीन हजारापेक्षा जास्त भाव दिला गेला. मात्र महाराष्ट्रात २९०० रुपये एफआरपी होती. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
टनामागे 'आरएसएफ'चा फरक ६०० रुपये कसा राहतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उसाच्या भावासाठी लढाई बंद करून शेतकऱ्यांच्या बाजूने एकही कायदा राहिला नाही. या विरुद्ध लढा आवश्यक झाला असल्याचे ते म्हणाले.
Soyabean Rate Today: आज सोयाबीनच्या भावात वाढ, जाणून घ्या आजचे दर
अतिवृष्टीनंतर मदत देण्याच्या मागणीसाठी देखील आंदोलन करण्यात आले. आम्ही दिवाळी सणाच्या दिवशी चटणी-भाकर खाण्याचे आंदोलन करूनही तालुक्यातील साखर कारखाने मूग गिळून गप्प बसले, असा आरोप 'मनसेच्या मीरा गुंजाळ यांनी केला.
तसेच कारखान्यांच्या ऊस वजनकाट्यात घोटाळा असल्याचा आरोप करून एफआरपीचा भाव लवकर जाहीर करण्याची सूचना करण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात सांगितले. यामुळे आता संघर्ष होण्याची शक्यता आहे.
युट्यूबवर व्हिडिओ पाहून शेतकऱ्याने केली खेकडा पालनाला सुरुवात, आता कमवतोय ६ लाख
दरम्यान, नेवासे तहसील कार्यालयात ज्ञानेश्वर, मुळा व गंगामाई साखर कारखान्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी संघटना तसेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या;
वाणेवाडीत साडेतीन एकर ऊस जळाला, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
शेणाचं केलं सोनं! शेणाच्या उत्पादनांमधून करोडोंची कमाई...
औरंगाबादेत बैलगाडा शर्यतीवरून राडा, पोलिसांचा लाठीचार्ज
Share your comments