MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

राज्यातील 44 साखर कारखाने साखर आयुक्तांनी टाकले काळ्या यादीत

मुंबई: राज्याच्या साखर आयुक्तांनी महाराष्ट्रातील जवळजवळ चौरेचाळीस साखर कारखान्यांना काळ्यायादीत टाकले आहे.या कारखान्यांनी विविध मार्गांचा अवलंब करीत शेतकर्यां ची फसवणूक केल्याचा ठपका साखर आयुक्तांनी ठेवला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
suger factory

suger factory

मुंबई: राज्याच्या साखर आयुक्तांनी महाराष्ट्रातील जवळजवळ चौरेचाळीस साखर कारखान्यांना काळ्यायादीत टाकले आहे.या कारखान्यांनी विविध मार्गांचा अवलंब करीत शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा ठपका साखर आयुक्तांनी ठेवला आहे.

 या काळ्या यादीत समावेश असणाऱ्या कारखान्यांमध्ये जय भवानी गेवराई, किसनवीर भुईंज, लोहारा मधील उस्मानाबाद जिल्हा लोकमंगल माऊली शुगर कारखाना, पैठण मधील शरद कारखाना, लातूरचा पन्नगेश्वरशुगर, तासगाव आणि खानापूर युनिट, नंदुरबारचा सातपुडा तापी, औसा मधील साईबाबा शुगर,वैद्यनाथ कारखाना इत्यादी कारखान्यांचा समावेश या यादीत आहे.

 काही कारखान्यांनी मागील गळीत हंगामातील उसाची एफआरपी अद्याप  शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जास्त रकमेचे आमिष दाखवणे आणि नंतर त्यांची फसवणूक करणे,ऊस गाळपास नकार देणे, काही निवडक शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जातीचे रक्कम देऊन त्यानंतर बहुसंख्य शेतकऱ्यांची फसवणूक करणे अशाप्रकारे काही साखर कारखान्यांकडून फसवणूक केली जात आहे.

 

राज्यातील काही कारखाने शेतकऱ्यांना वेळेवर उसाचे पैसे देतात. त्यामुळे सक्षम कारखाना कोणता आहे शेतकऱ्यांना सहन समजावे, यासाठी राज्यातील सर्व साखर कारखान्याचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता.

English Summary: 44 suger factory black listed by suger commisioner in maharashtra Published on: 28 September 2021, 10:09 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters