1. बातम्या

राज्यात 41 हजार 393 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई: राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

KJ Maharashtra
KJ Maharashtra


मुंबई:
 राज्यात आज १३५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३ हजार ६८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४१ हजार ३९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सध्या राज्यात ४६ शासकिय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १२३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-६८ (मुंबई ४८, ठाणे ८, नवी मुंबई ६, वसई विरार १, पालघर १, पनवेल १), नाशिक- २५ (धुळे १, जळगाव २१, नाशिक ३), पुणे- १६ (पुणे ९, सोलापूर ७), कोल्हापूर-२ (कोल्हापूर २) औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर-३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), अकोला-३ (वाशिम २, यवतमाळ १)

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८५ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७१ रुग्ण आहेत तर ४४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२३ रुग्णांपैकी ९२ जणांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २७१० झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३० एप्रिल ते १ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९३ मृत्यूंपैकी मुंबई ४०, जळगाव-१६, ठाणे ८, सोलापूर-६, नवी मुंबई-५, रायगड-३, परभणी २, नाशिक २, वाशिम-२ , औरंगाबाद-२, पनवेल १, पालघर-१, वसई विरार-१ उस्मानाबाद -१, धुळे-१,नांदेड १ आणि यवतमाळ-१ असे मृत्यू आहेत.

English Summary: 41 thousand 393 corona patients are undergoing treatment in the state Published on: 05 June 2020, 03:44 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters