शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या समस्या तसेच सर्वसामान्य शिवसैनिकांचे विविधप्रश्न मांडण्यासाठी तसेच इतर अनेक प्रकारच्या मागण्या घेऊन गंगापुर तालुक्यातील शिवसैनिकांनी चक्क चारशे किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला आहे.
गंगापूर ते मातोश्री असा चारशे किलोमीटरचा पायी प्रवास करत हेशिवसैनिक मुंबईत पोचल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. गंगापुर तालुक्यातील सावखेडा गावचे राजुशेठ जैस्वाल तसेच रामनाथ लक्ष्मण मोरे, ज्ञानेश्वर विनायक अदमाने,नवनाथ शिवाजी शेवाळे असे हे चार शिवसैनिकांनी गंगापुर तालुक्यातील सावखेडा ते मुंबई येथील मातोश्री असा 400 किलोमीटर पायी प्रवास सुरू केला आहे.
सर्वसामान्यांच्या अडचणी मांडण्याकरता पायी प्रवास करुन ते मुख्यमंत्र्यांकडे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या देखील प्रश्न पडणार आहेत त्यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान पाहता पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी तसेच सोयाबीनला हमीभाव मिळावा अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण मागण्या हे शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडणार आहेत.
त्यासोबतच शिवसेनेत असलेल्या अंतर्गत गटबाजी थांबवावी तसेच सामान्य शिवसैनिकांना त्यांच्या संपत्तीवर कर्ज उपलब्ध करून द्यावे असे विविध प्रश्न घेऊन ये शिवसैनिक मुंबई मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गंगापूर सावखेडा ते मुंबई अशा पायी प्रवासाला निघाले आहेत.
Share your comments