राज्यातील जवळजवळ 40 साखर कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपि अद्याप पूर्णपणे अदान केल्याने संबंधित कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामाचा परवाना करण्यात आला आहे
तसेच ज्या कारखान्यांनी दिवाळीपर्यंत एफआरपी न दिल्यास दिवाळी नंतर ही एफआरपी व्याजासह वसूल करण्याचा इशारा साखर आयुक्तालय यांनी दिला आहे.
यावर्षीच्या गाळप हंगामाला 15 ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. यावर्षी जवळजवळ 194 कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी मागितली.त्यातील54 कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाले असून त्यातील 40 कारखान्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
मागच्या गाळप हंगामात 154 कारखान्यांनी 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत 100% एफआरपी दिली. चालू गाळप हंगामात आतापर्यंत 54 साखर कारखाने सुरू झाले असून अनेक कारखान्यांच्या संचालकांनी आर्थिक अडचणींमुळे तसेच तांत्रिक दुरुस्तीमुळे गाळपहंगामास सुरुवात केलेली नसून येत्या आठवडाभरात उर्वरित कारखान्यांमधील गाळप हंगामास सुरुवात करण्यात येईल असे साखर आयुक्तालय कडून सांगण्यात आले.
मागच्या गाळप हंगामातील 40 कारखान्यांनी शेतकऱ्यांची तीनशे कोटी (1 टक्का ) एफ आर पी देणे अद्याप बाकी आहेत. या चाळीस कारखान्यांनी जवळपास 90 टक्क्यांहून अधिक एफ आर पी दिली असून शिल्लक एफ आर पी दिवाळीपर्यंत देणे बंधनकारक आहे अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.तोपर्यंत गाळप हंगामास परवानगी देण्यात येणार नसल्याचे त्यांना सूचित करण्यात आले आहे.
Share your comments