1. बातम्या

धुळे जिल्ह्यातील 4 शेतकऱ्यांना मिळाला राज्य शासनाचा कृषिभूषण पुरस्कार

कृषी, पशु व दुग्ध संवर्धन विभागातर्फे सन 2018 व 2019 या दोन वर्षाच्या कृषिभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये धुळे जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कृषी, पशु व दुग्ध संवर्धन विभागातर्फे सन 2018 व 2019 या दोन वर्षाच्या कृषिभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

यामध्ये धुळे जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी कृषी क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाला.

 

त्यानुसार सन 2018 साठी वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार धुळे तालुक्यातील चांदे या गावातील शेतकरी वाल्मीक आनंदराव पाटील यांना मिळाला, तसेच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार आदिवासी गटातून शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी येथील कुमार सिंग पावरा यांना तर 2019 या वर्षासाठी चा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार साक्री तालुक्यातील सामोडे येथील नरेंद्र राव साहेब भदाणे यांना मिळाला. 

 

वसंतराव नाईक कृषि निष्ठ पुरस्कार शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील शेतकरी शहरात प्रकाश पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

English Summary: 4 farmers from Dhule district got state government's Krishi Bhushan award Published on: 03 April 2021, 02:24 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters