Pune News :
राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने पू्र्णपणे विश्रांती दिली. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. पावसाची कमतरता आणि वाढते तापमान यामुळे राज्यातील धरण साठे मागच्या वर्षीची सरासरी देखील गाठतील की नाही अशी चिंता आहे. ५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील केवळ चारच धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे. राज्यात मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात १६ धरणं पुर्ण क्षमतेने भरली होती.
ऑगस्ट महिना संपला तरी राज्यात अपेक्षित पाऊस नाही. यामुळे राज्यात येणाऱ्या काही दिवसांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील धरणातील साठा ६४.७५ टक्के आहे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा २० टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ८४.८४ टक्के जलसाठा होता.
मराठवाड्यात पाऊस नसल्यामुळे या भागात देखील पाण्याची मोठी कमरता आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात फक्त ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी जायकवाडीत ९४ टक्के पाणीसाठा आहे. भुसानी सोडता एकाही जलसाठ्यात ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा नाही. हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षी सिध्देश्वर आणि येलदरी धरणात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा होता. मात्र यंदा सिध्देश्वर धरणात ४६ टक्के तर येलदारीत ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
उजनी धरणात १५ टक्के पाणीसाठा
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण देखील यंदा पूर्ण क्षमतेने भरले नाही. धरणात सध्या १७.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याचवेळी उजनी धरण १०० टक्के भरलं होते. यामुळे सोलापूर, पुणे, अमहदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांतील पाणी प्रश्न मिटला होता. पण यंदा मात्र धरणात पाणी नसल्याने पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Share your comments