राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. यामुळे मोठ्या प्रमाणावर कारखानदारी चालते. असे असताना आता ऊस तोडणी कामगारांकडून वाहतूकदार आणि कारखानदारांची बुडवलेली आकडेवारी समोर आली आहे. ही रक्कम कोटींमध्ये असून आत्तापर्यंत तब्बल साधारण 39 कोटी रुपयांना उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवले आहे.
यामुळे हा आकडा विचार करायला लावणारा आहे. साखर आयुक्तालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. उसाचे उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांच्या समोरील समस्या काही कमी नाहीत. ऊसतोडणी मजुरांवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते.
ऊस तोडणाऱ्या टोळीने वाहतूकदार किंवा कारखानदारांना फसवणे हे आता नवीन राहिलं नाही. प्रत्येक सिजनला याबाबत फसवणुकीच्या घटना समोर येत असतात. 2004 पासून 2020 पर्यंत राज्यातील 81 साखर कारखांन्याची उसतोड कामगार आणि मुकादम यांनी फसवणूक केली आहे.
हा चिखल पायाला काय, अख्ख्या अंगाला लागला तरी झटकला जात नाही कारण..
ही रक्कम 39 कोटी 46 लाख रुपयांची असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये अडकले आहेत. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांनी यासाठी घेतलेली यंत्रणा देखील विकून टाकली आहे.
महत्वाच्या बातम्या;
500 दिवस घरापासून दूर, 108 किलो वजन केले कमी, सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुलाने केलं तरी काय..
चोरट्यांचे आगळंवेगळं धाडस! शेतकऱ्यांनो आता मोटर नाही तर चालू विद्युत डीपी'च गेलीय चोरीला..
2024 मध्ये विरोधी पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? अखिलेश यादव यांनी सांगितले महाराष्ट्रातील 'या' नेत्याचे नाव..
Share your comments