भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांसाठी ही अतिशय खुशखबर आहे. या विषयी चा शासन निर्णय 6 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आला आहे. राज्यामध्ये मनरेगाच्या अंतर्गत शेतकरी फळबाग लागवड योजनेअंतर्गत पात्र होत नाहीत
अशा शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजनेचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2018 मध्ये स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरू करण्यात आली होती.
या योजनेच्या माध्यमातून पहिल्या, दुसर्या व तिसर्या अशा तीन वर्षामध्ये मिळून शंभर टक्के अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून 2018 ते 19 आणि 2019 -20 या वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली होती. त्यांचे पहिले हप्ते देखील वितरित झाले नव्हते. अशा शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा होती. हा शासन निर्णय 6 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आलेला आहे.
यासंबंधीचा जीआर
- राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेचे सन 2021 -22 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या प्रलंबित दायित्व पोटी 37 कोटी 53 लाख 18 हजार निधी आयुक्त यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- सदरचा निधी खालील लेखशीर्षन अंतर्गत चालू वर्षी अर्थसंकल्पी केलेल्या तरतुदीतून खर्च टाकावा.
मागणी क्रमांक डी -3
2401- पिक संवर्धन
119, बागायती व भाजीपाला पिके
- फळे (33) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना,33- अर्थसहाय्य, (2401A889)
- या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आलेल्या रुपयात 37 कोटी 53 लाख 18 हजार रकमेचे कोषागार आतून आहरण व वितरण करण्याकरिता सहाय्यक संचालक ( लेखा-1) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. चालू वर्षी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेला निधी सन 2018-19 वर्ष व 2019-2020 या वर्षातील प्रलंबित दायित्व च्या अदागिसाठीवापरण्यात यावा.
- सदर योजनेचे संदर्भ क्रमांक एक येथे नमूद केलेल्या शासन निर्णयातील तर कधी तसेच वेळोवेळी केलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने अंमलबजावणी करावी.
- हा शासन निर्णय maharashtra.gov.inया संकेत स्थळावर उपलब्ध आहे.( संदर्भ- मी E शेतकरी )
Share your comments