गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यात बिबट्याची सुरू असलेली चर्चा आज इंदापूर तालुक्यात आली आहे. आता सणसर येथील 36 फाटा या ठिकाणी रात्री बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये याची चर्चा सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुक्यात बिबट्याची सुरू असलेली चर्चा आज इंदापूर तालुक्यात आली आहे. आता सणसर येथील 36 फाटा या ठिकाणी रात्री बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये याची चर्चा सुरू आहे.
चार दिवसापूर्वी लिमटेकमध्ये सदृश प्राण्याने सहा शेळ्या फस्त केल्या होत्या. असे असले तरी या ठिकाणी बिबट्या असल्याचा कोणताही पुरावा वन विभागास मिळाला नव्हता. मात्र आता सणसरमध्ये बिबट्या आढळल्याने चर्चा सुरू झाली आहे.
सणसरमधील 36 फाटा येथील मिऱ्याचा माळ परिसरामध्ये रात्री दोन वाजता नदीजोड प्रकल्पावरील सुरक्षारक्षक ड्युटीवर जात असताना शेतात बिबट्या डांबरी रस्त्याने पुढे गेल्याचे त्यांना दिसले. यामुळे ताब्यात इतर शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.
यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी गावातील नागरिकांनी याठिकाणी पाहणी देखील केली आहे. यावेळी येथील शेतात चिखलामध्ये प्राण्याचे ठसे आढळले आहेत. याची खात्री करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.
English Summary: 36 leopards in Sansar? An atmosphere of fear among farmers, investigation begins after employees see leopard-like animals...Published on: 28 September 2023, 03:31 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments