२०२१ मध्ये राज्यात अनेक ठिकाणी मोठी संकटे आली होती. चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे राज्याला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावेच्या गावे उध्वस्त झाली होती. मात्र, महाराष्ट्रात आलेल्या पूरस्थितीच्या नुकसानापोटी केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत राज्याला ३५५.३९ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
यामध्ये पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशासाठी पूर आणि भूस्खलनाच्या नुकसानापोटी १,६८२.११ कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या केंद्रशासीत प्रदेशामध्ये वर्ष २०२१ मध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये याचा फायक अनेकांना बसला होता. यामुळे या निधीची मागणी केली जात होती.
या नुकसानापोटी या पाच राज्यांना १,६६४.२५ कोटी आणि पुद्दुचेरीला १७.८६ कोटी रुपयांची अतिरिक्त केंद्रीय मदत मंजूर केली आहे. केंद्राकडून मंजूर अतिरिक्त मदत केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मध्ये राज्यांसाठी जारी केलेल्या निधीपेक्षा अधिकचा निधी आहे. यामुळे आता यामध्ये अनेक कामे करता येणार आहेत. याबाबत अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती.
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना याचा फटका बसला होता, यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे मदतीची मागणी केली जात होती. यामुळे उशिरा का होईना आता मदत झाली आहे. केंद्र सरकार मदत करताना राजकारण करत असते. असे म्हणत अनेकदा टीका करण्यात आली होती. तसेच कोरोनामुळे निधी लवकर उपलब्ध होत नव्हता.
Share your comments