Jayakwadi Water Dam : जायकवाडी धरणात ३४ टक्के पाणीसाठा; शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे
गतवर्षी आजच्या दिवशी जायकवाडी धरणसाठ्यात ९४.९९ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला होता. मराठवाड्यात पावसाने विश्रांती दिल्यामुळे अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
पावसाने मागील १० ते १२ दिवसांपासून उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहे. धरणासाठ्यातील पाणीसाठा पाहिला तर चिंता वाढली आहे. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ ३४.११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
गतवर्षी आजच्या दिवशी जायकवाडी धरणसाठ्यात ९४.९९ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला होता. पण आता मराठवाड्यात पावसाने विश्रांती दिल्यामुळे अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
मराठवाड्यातील नांदेडचा काही भागातच चांगला पाऊस आहे. तर इतर भागात मात्र जोरदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. पेरणी केलेली पिके पाण्याला आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पाण्याअभावी विहीर कोरड्या पडल्या आहेत. त्यात पावसाने दडी मारल्याने पाण्याअभावी पीके वाळू लागली आहेत.
English Summary: 34 percent water storage in Jayakwadi Dam Farmers look to the skyPublished on: 16 August 2023, 11:11 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments