संपूर्ण देशात 31 जानेवारीला विश्वासघात दिवस साजरा करणार असल्याची घोषणा शुक्रवारी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. यामध्ये जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर शेतकरी संघटनेच्या एसकेएमनेसांगितले की आंदोलनाशी संबंधित असलेल्या सर्व शेतकरी संघटनांनी हा विरोध मोठ्या उत्साहात करा.देशातील कमीत कमी पाचशे जिल्ह्यात हा कार्यक्रम आयोजित केला जाईल अशी आशा आहे. यासंबंधीचे निवेदन हे केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. यासंबंधी 15 जानेवारीला झालेल्या आढावा बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चा 31 जानेवारीला विश्वासघात दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये शेतकऱ्यांच्या असे म्हणणे आहे की,सरकारने त्यांना धोका दिला आहे.
वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एक वर्षापेक्षा अधिक काळ आंदोलन केले होते. केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलन देखील मागे घेतले. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने घोषणा केली,जर केंद्र सरकार त्यांच्या इतर मागण्या पूर्ण करण्यात अपयशी होत असेल तर आंदोलन पुन्हा सुरू होऊ शकते. 15 जानेवारीच्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीनंतर सरकारने 9 डिसेंबर 2021 च्या कागदपत्रात केलेलेआश्वासन पूर्ण केले नाही या माध्यमातून सरकारची शेतकरीविरोधी भूमिका स्पष्ट होत आहे.
संयुक्त किसान मोर्चानेम्हटले की, गेल्या दोन आठवड्यात आंदोलनकर्त्या विरोधात दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याबाबत व शहिदांच्या कुटुंबियांसाठी चे नुकसान भरपाई बाबत कोणतीही हालचाल केली नाही. तसेच सरकारने किमान आधारभूत किमती च्या मुद्द्यावर समिती स्थापन करण्याची घोषणा देखील केली नाही. त्यामुळे देशभरात शेतकऱ्यांनी विश्वासघात दिनाच्या माध्यमातून सरकार विरोधातील संताप व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Share your comments