Turmeric Rate : हिंगोलीत हळदीला ३० हजार प्रतिक्विंटलचा दर; पाहा बाजारभाव कसा राहिल
वसमत बाजार समितीत बाराही महिने हळदीची विक्री केली जाते. परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले यांनी त्यांच्याकडील अकरा पोती हळद वसमतच्या बाजारात विक्रीसाठी आणली होती.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बाजार समितीत हळदीला ३० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. यामुळे हळद उत्पादक शेतकरी समाधानी झाले आहेत. आजवरचा हा उच्चांकी दर आहे.
वसमत बाजार समितीत बाराही महिने हळदीची विक्री केली जाते. परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले यांनी त्यांच्याकडील अकरा पोती हळद वसमतच्या बाजारात विक्रीसाठी आणली होती. तेव्हा या हळदीला तब्बल ३० हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे.
हिंगोली बाजार समितीत लिलाव पद्धतीने हळदीची विक्री केली जाते. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी येथे हळद विक्रीला आणतात. तसंच हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर टिकून राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
English Summary: 30 thousand per quintal for turmeric in Hingoli Let's see how the market will farePublished on: 05 August 2023, 12:13 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments