1. बातम्या

Crop Loss Compensation: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शिंदे-फडणवीस सरकारकडून 3 हजार 500 कोटींची नुकसानभरपाई जाहीर

Crop Loss Compensation: राज्यात यंदा मान्सूनच्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी उघड्यावर आला आहे. हातातोंडाला आलेला खरीप पिकांचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
shinde-fadnavis

shinde-fadnavis

Crop Loss Compensation: राज्यात यंदा मान्सूनच्या (Monsoon) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी उघड्यावर आला आहे. हातातोंडाला आलेला खरीप पिकांचा (kharip Crop) घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उदाहरणार्थ, कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पिकांवर वाढणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडला आहे.

पावसात पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकरी सातत्याने शासनाकडे भरपाईची मागणी करत होते. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलासा देत त्यांच्या बँक खात्यात 3 हजार 500 कोटी रुपयांची भरपाईची रक्कम पाठवण्यात आली आहे. ते म्हणाले की, 15 सप्टेंबरपासून मदतीचे वाटप सुरू झाले आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधत सांगितले की, मागील सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तिजोरीत खडखडाट होता हे अजितदादांनाही माहीत होते. सत्तार पुढे म्हणाले की, आमचे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.

पावसाने झाले पिकांचे नुकसान? तर काळजी करू नका, या सरकारी योजनेतून होईल भरपाई

27 लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका

दरम्यान, केंद्र सरकारकडे ऑनलाइन ई-पीक तपासणीमध्ये बदल करण्याची मागणी करणार असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले. सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेचे प्रश्न सोडविण्यास सक्षम आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत पोहोचली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर ऑनलाइन पैसे जमा केले आहेत. सत्तार पुढे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे 27 लाख शेतकरी बाधित झाले आहेत.

तर मराठवाड्यात गोगलगाईमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा नुकसानीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 97 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची केळीला 18.90 रुपये किलो भाव जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात मोठे नुकसान

खरीप हंगामात सोयाबीनचे पीक जोमात आल्यानंतर अनेक ठिकाणी गोगलगायींनी ते नष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली होती. लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात गोगलगाईने पिकांचे अधिक नुकसान केले.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या 3 जिल्ह्यांना 98 कोटी 58 लाख रुपयांचा निधी देण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत प्रगती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, जेणेकरून या यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतील, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, कृषी यंत्राद्वारे कृषी योजनांची माहिती गावातील अंतिम लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाकडे शासन लक्ष देत आहे. यावेळी सत्तार म्हणाले की, खेड्यापाड्यातील शेतकरी सुखी व्हावा, शासकीय योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचावा हा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. थेट गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत.

महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रात २४ तासांपासून पावसाचे थैमान! ३ जणांचा मृत्यू; येत्या काही तासांत आणखी धो धो कोसळणार
हिरोने केली दमदार नवीन स्प्लेंडर लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त मायलेज

English Summary: 3 thousand 500 crore compensation announced by Shinde-Fadnavis government Published on: 18 September 2022, 05:42 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters