भारतीय लोकांच्या आहारामध्ये बाजरी,पौष्टिक अन्नधान्य, फळे, विविध प्रकारच्या भाज्या, दुग्धजन्य पदार्थ,मासेयासारख्या पारंपरिक खाद्यपदार्थ पुन्हा खाद्यसंस्कृतीत आज्ञा वर केंद्र सरकार भर देत आहे अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या मागील काही वर्षांपासून या खाद्यपदार्थांचे चांगले उत्पादन भारतात होत आहे तसेच भारतामध्ये असल्या प्रकारचे निरोग अन्न पदार्थ उपलब्ध होत आहेत. जी-20 परिषदेतील कृषिमंत्र्यांच्या बैठकीच्या दुसऱ्या सत्राच्या वेळी ते बोलत होते.व्हीसीच्या माध्यमातून केलेल्या भाषणात ते म्हणाले की, पोषक अन्नपदार्थांचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने हिंदुस्थानचा सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे व त्यानुसार 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले गेले आहे.
पोषक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळावे यासाठी बाजरी वर्ष साजरी करण्याला सगळ्या राष्ट्रांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बायो फोर्टिफाइड वाणहे सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे ते आहाराचे प्रमुख स्त्रोत आहेत असे त्यांनी सांगितले. जगातील कुपोषण दूर करण्यासाठी यांना घटकांच्या शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. अशा विविध प्रकारच्या पिकांच्या 17 जाती विकसित करण्यात येऊन त्यांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने सिंचनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच खतांच्या संतुलित वापर करून जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी, शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोचण्यासाठी सक्षम वाहतुकीचे जाळे निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत असे ते म्हणाले.
Share your comments