मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीचे अतोनात नुकसान होऊन कापूस उत्पादनात प्रचंड घट आली. या घटीमुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी झाल्याने कधी नव्हे एवढे कापसाच्या दर यावर्षी आहेत.
याच पार्श्वभूमीवर जिनिंग-प्रेसिंग उद्योगाचा विचार केला तर दरवर्षी जून ते जुलै पर्यंत जिनिंग प्रेसिंग उद्योग सुरू राहतात. परंतु यावर्षी कापसाचा पुरवठा अत्यल्प असल्याने जवळजवळ आत्ताच 90 टक्के जिनिंग आणि प्रेसिंग मिल बंद झाले आहेत. या महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व जिनिंग बंद होतील. या सगळ्यांचा परिणाम हा जिनिंग-प्रेसिंग उद्योगाला भोगावा लागत असून जवळजवळ यावर्षी अठराशे कोटींच्या घरात या उद्योगाला तोटा होण्याची शक्यता आहे. दर वर्षाचा विचार केला तर या उद्योगाच्या माध्यमातून 15 लाख कापूस गाठींची निर्यात होत असते. परंतु या वर्षी कापूस पीक चांगले होते परंतु काही काळाने अतिवृष्टी झाल्याने कापूस उत्पादनात प्रचंड घट आली. त्याचा परिणाम हा कापूस पुरवठ्यावर झाला. हा पुरवठा फारच कमी असल्याने ऐन दिवाळीच्या काळामध्ये कापसाला साडेआठ ते नऊ हजार रुपये असा भाव मिळत होता. परंतु आता चक्क कापसाचे दर हेदहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
भाव असून देखील हव्या त्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी बाजारात आला नाही. भाव असतानादेखील कापूस विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल न झाल्याने जिनिंग मिल्स अक्षरशः तीन दिवसांच्या अंतराने सुरू ठेवण्यात आल्या.इतकेच नाही तर एकाचपाळीत काम सुरू होते. आताही तीच परिस्थिती असून जिनिंग आणि प्रेसिंग मिल्स कडे जो कापूस शिल्लक आहेत त्याच्या गाठी बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. हा शिल्लक कापसाचा साठा देखील फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत संपेल. दर वर्षीच्या तुलनेत या वर्षी तब्बल चार महिने या मिल्स बंद राहणार आहेत. याबाबतीत खानदेश जिनिंग, प्रेसिंग मिल ओनर्स असोसिएशन चा विचार केला तर त्यांनी या वर्षी 15 लाख गाठींचे उत्पादनाचा लक्ष ठेवले होते. परंतु कापसा अभावी आतापर्यंत फक्त नऊ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे.
येणाऱ्या दहा दिवसात आणखी एक लाख गाठींचे उत्पादन होऊन एकूण नऊ लाख गाठींचे उत्पादन होईल. जर 15 लाख गाठींची निर्मिती झाली असती तर त्यामधून चार हजार पाचशे कोटींची उलाढाल होत असते. परंतु या वर्षी फक्त नऊलाख गाठी तयार झाल्याने सत्ताविसशे कोटींची उलाढाल होईल. यानुसार जवळजवळ अठराशे कोटींचा तोटा या उद्योगाला कापसा भावी सहन करावा लागत आहे. (Source-sakal)
Share your comments