यावर्षीच्या खरीप हंगामासाठी देण्यात येणारे पीक कर्जात वाढ होऊन तब्बल जिल्ह्यातील 98 हजार शेतकऱ्यांना एक हजार आठशे दोन कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेने एकुण उद्दिष्ट पैकी 467 कोटी कर्जाचे वाटप केले आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्याला 780 कोटी रुपयांचे खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु या वर्षी मान्सूनलाउशीर झाल्याने पीक कर्जाच्या बाबतीत मागणीदेखील हवी तेवढी नव्हती.
.तसेच वितरणाची प्रक्रिया देखील कासवगतीने सुरू होती परंतु याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बँकाचा आढावा घेत शेतकऱ्यांना पीककर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या होत्या. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पीक कर्जाची मागणी वाढत गेली आणि कर्ज प्रक्रियाला देखील गती आली.
चालू परिस्थितीत दूर गेलेल्या कर्ज उद्दिष्ट पैकी जवळजवळ 65 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जवळजवळ 98 हजार शेतकऱ्यांना 1802 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. नाशिक जिल्हा बँकेने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा 467 कोटींचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी 1186 कोटींचे वाटप केले आहे.
Share your comments