1. बातम्या

Irshalwadi Update : इर्शाळवाडीतील दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू; रेस्क्यू ऑपरेशन सुरुच

इर्शाळवाडीतील पीडीतांना राहण्यासाठी कंटेनरमध्ये राहण्यासाठी सध्या सोय करण्यात आली आहे. स्थानिक महानगरपालिका, ग्रामपंचायत आणि पीडब्ल्यूडी विभागाकडून ही सुविधा देण्यात आली आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Irshalwadi Update

Irshalwadi Update

रायगड 

रायगडमधील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. NDRF आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रेस्क्यू करण्यात येत आहे. आज देखील याठिकाणी NDRF च्या चार टीम दाखल झाल्या आहेत. दुर्घटनास्थळी कालपासून (दि.२०) मदतकार्य सुरु आहे.

रात्री अंधार झाल्याने आणि पावसामुळे हे काम थांबवण्यात आलं. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह स्थानिक नागरिक न थकता दिवसभर मातीचा ढिगारा उपसण्याचं काम करत होते. या ठिकाणी जेसीबी मशीन किंवा पोकलेन जाऊ शकत नसल्याने कुदळ, फावडे घेऊनच काम करावं लागतं आहे.

इर्शाळवाडीतील पीडीतांना राहण्यासाठी कंटेनरमध्ये राहण्यासाठी सध्या सोय करण्यात आली आहे. स्थानिक महानगरपालिका, ग्रामपंचायत आणि पीडब्ल्यूडी विभागाकडून ही सुविधा देण्यात आली आहे. या ठिकाणी सध्या ३० कंटेनर तैनात करण्यात आले आहेत. ज्यांना रेस्क्यू करण्यात आले आहे, अशा लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची या कंटेनरमध्ये सुविधा करण्यात आली असल्याची माहिती रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर कोतुडे यांनी दिली आहे.

दरम्यान, आज सकाळपासूनच इर्शाळवाडीत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आजही या संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, आता या पावसातच जवांनाना ढिगारा उपसून ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांचा शोध घ्यावा लागणार आहे.

English Summary: 16 killed in Irshalwadi accident Rescue operation continues Published on: 21 July 2023, 11:47 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters