पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील एका शेतकऱ्याच्या खात्यावर अचानक 15 लाख 34 हजार 624 रुपये रक्कम जमा झाली. अचानक रक्कम जमा झालेल्या शेतकऱ्याला आठवली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा ती म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा केले जातील.
त्यामुळे शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि या रकमेतून एक छानसं टुमदार घर देखील बांधले.परंतु नंतर सहा महिन्यांनी जे सत्य समोर आले ते झोप उडवणारे होते. जमा झालेली रक्कम ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाचे असल्याचे बँकेचे लक्षात आले. त्यामुळे आता संबंधित बँकेने शेतकऱ्यांलारक्कम भरण्यासाठी पत्र पाठवले आहे मात्र एवढे पैसे कोठून देणार असा प्रश्न आता या शेतकऱ्याला पडला आहे. त्यामुळे आता या बाबतीत तालुका प्रशासन आणि बँक काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शेतकऱ्यांचे नाव ज्ञानेश्वर जनार्धन औटे असून त्यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे.
त्यांच्या खात्यावर सहा महिन्या आधी चक्क 15लाख 34 हजार सहाशे 24 रुपये एवढी रक्कम जमा झाली. रक्कम जमा झाल्यानंतर त्यांनी रीतसर बँकेत जाऊन पासबुक वर नोंद देखील करून आणली. ही जमा झालेली रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणापृतीची असावी असे श्री आवटे यांचा समज झाला. त्यापैकी त्यांनी सदर रकमेपैकी टप्प्याने नऊ लाख सात हजार रुपये खर्च करुन चांगले घर देखील बांधले.औटेयांनास्वतःचे घर झाल्याने त्यांना खूप आनंद झाला परंतु तो आनंद काही दिवस टिकला. पाच महिन्यानंतर संबंधित बँकेच्या मॅनेजर ने22 डिसेंबर रोजी खात्यातील शिल्लक रक्कम होल्ड केली. सदर रक्कम ही शेतकऱ्याचे नसून पिंपळवाडी तालुका पैठण येथील ग्रामपंचायतीची औरंगाबाद जिल्हा परिषदेने पाठवलेली होती.
चुकून ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा झाल्याने बँकेने सदर शेतकऱ्याला कळविले. त्यापैकी काही रक्कम आपण खर्च केले असून ही सर्व रक्कम त्वरित बँकेत जमा करावी असे लेखी पत्र बँकेने 4 फेब्रुवारीला दिले.त्यामुळे संबंधित शेतकरी कुटुंबाची झोप उडाली असून आता नऊ लाख रुपये कुठून आणायचे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे.(स्रोत-सकाळ)
Share your comments