सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी, बुलडाणा जिल्ह्यात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार मोर्चा पार पडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाही तर 29 नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेवू असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला होता. त्यानंतर तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याने रविकांत तुपकर यांनी आंदोलन ताप्तुरते मागे घेतले आहे.
पिवळा मोझॅक, बोंड अळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रतीएकर १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ९ हजार व कापसाला किमान १२ हजार ५०० रुपयांचा भाव गरजेचा आहे. शासनानं कोणतीही अट न ठेवता संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशा मागण्या रविकांत तुपकर यांनी केल्या होत्या.
या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाण्याच्या चिखली तालुक्यात रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या असून काही मागण्यासाठी सरकारसोबत चर्चा करू असं आश्वासनही त्यांनी रविकांत तुपकरांना दिले. त्यामुळे अखेर रविकांत तुपकर यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेतल आहे. मात्र आंदोलन मागे घेत असताना तुपकर यांनी सरकारला १५ दिवसांची वेळ दिली आहे. मात्र त्यानंतर आम्ही थांबणार नाही, आणखी उग्र आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला.
Share your comments