1. बातम्या

देशातील साखर कारखान्यांनी थकवले शेतककऱ्यांचे १५ हजार कोटी

पुणे : अतिरिक्त उत्पादन, किंमतीत सतत होणार बदल आणि सरकारची बदलत जाणारी धोरणे याचा परिणाम म्हणजे देशातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल १५ हजार ६८३ कोटी रुपये थकवलेले आहेत.

KJ Staff
KJ Staff


पुणे  : अतिरिक्त  उत्पादन, किंमतीत सतत होणार बदल आणि सरकारची बदलत जाणारी  धोरणे याचा परिणाम म्हणजे  देशातील  साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल  १५ हजार ६८३ कोटी रुपये थकवलेले आहेत. यातील सर्वात  जास्त रक्कम म्हणजे १२ हजार २२९ कोटी रुपये  हे नुकत्याच संपलेल्या हंगामाचे आहेत.

साधारपणे शेतकऱ्याची ऊसाची बिले  मिळायची प्रक्रिया सतत चालू असते. परंतु मागच्या वर्षी  साखर उत्पादनात मोठ्या प्राणात वाढ झाली परंतु उत्पादनाच्या किंमती मात्र खालीच  राहिल्या. त्यामुळे साखर कारखान्यांकडे  शेतकऱ्यांना द्यायला  पैसे नाहीत. त्यामुळे  उसाचे पैसे थकले आहेत. एकूण ७५ हजार कोटींच्या देण्यांपैकी ६२ हजार कोटींची देणी कारखान्यांनी दिली आहेत.  ही माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच संसदेत दिली.

महाराष्ट्र  आणि उत्तरप्रदेश हे साखर उत्पादनाच्या बाबतीत देशात आघाडीची  राज्ये आहेत. यावर्षीही गतवर्षीच्या तुलनेत ऊसाखालील क्षेत्र वाढलेले आहे. येणाऱ्या  ऑक्टोबर महिन्यात ऊसाच्या नवीन हंगामाला सुरुवात होत आहेत. हंगाम संपेपर्यंत  देशात मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप  होणार आहे. परंतु  यंदा कोरोनामुळे बाजारात मंदी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखानदारांवर अधिक  भार पडण्याची शक्यता आहे.

English Summary: 15,000 crore farmers exhausted by sugar mills in the country Published on: 17 September 2020, 04:42 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters