देशातील साखर हंगामाला सुरुवात झाली असून ५ नोव्हेंबरअखेर देशातील १४९ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. गेल्यावर्षी याच तारखेला फक्त ३९ कारखाने सुरू होते. आतापर्यंत या कारखान्यांनी उसाचे ५४.६१ लाख टन गाळप केले आहे. ते मागील वर्षी झालेल्या गाळपापेक्षा ४१.७५ लाख टनांनी अधिक आहे. देशात साखरेचे आजअखेर ४.२५ लाख टन साखरेचे उत्पादन ही झाले आहे. हे साखर उत्पादन गतवर्षीच्या या तारखेच्या उत्पादनापेक्षा ३.२० लाख टनांनी जास्त आहे. देशपातळीवरचा साखर उतारा ७.८२ असून तो गतवर्षाच्या साखर उताऱ्यापेक्षा ०.३८ टक्क्याने कमी आहे.
ऊस गाळपात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून राज्यातील ६१ कारखान्यात गाळप सुरू झाले आहे. त्यातून ५ नोव्हेंबरअखरे २३.५७ लाख टन उसाच्या गाळपातून सरासरी ७ टक्के उताऱ्याने नव्या साखरेचे १.६५ लाख टन उत्पादन झाले आहे. हंगामाअखेर महाराष्ट्रातून इथेनॉलसाठी वळविण्यात आलेल्या साखेची अंदाजित मात्रा लक्षात घेता निव्वळ साखरेचे ९५ लाख टन उत्पादन अपेक्षित आहे, जे गेल्या वर्षीच्या ६१.७१ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटकात १८ कारखान्यांननी १५.६१ लाख टन ऊस गाळपातून सरासरी ८६५ टक्के उताऱ्याने १.३५ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे.
हंगामाअखेर कर्नाटकातून ४३ लाख टनांचे साखर उत्पादन होण्याचा अंदाज असून ते गतवर्षीच्या ३५ लाख टनांपेक्षा ८ लाख टनांनी जास्त आहे. उत्तर प्रदेशातील ५० कारखान्यांचे गाळप सूरू झाले असून, त्याद्वारे ९.४१ लाख टन उसाचे गाळप झाले. ८.५० टक्के उताऱ्याने ८० हजार टनांचे साखर उत्पादन झाले आहे.
Share your comments