पर्यटन खात्याच्या बजेटमध्ये ६ पटीने वाढ, १४०० कोटी रुपयांची तरतूद

Saturday, 07 March 2020 04:34 PM


औरंगाबाद - राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण व पर्यटनासाठी काम केले आहे. नेहमी अर्थसंकल्पात वंचित राहणारे पर्यटन खात्यावर यंदा लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या पर्यटन खात्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या दोन वेळच्या अर्थसंकल्पांच्या तुलनेत यात यंदा तब्बल ६ पट वाढ झाली आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी भरभरून दिले असताना मराठवाडा आणि विदर्भाच्या पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. वरळीत आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुल निर्मित, मंबईचा पर्यटन विकास, हाजी अली परिसराचा विकास महाविद्यालयात पर्यटन अभ्यासक्रम, लोणार सरोवराचा विकास, अचलपूर शहराचा पर्यटन विकास, समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण, पाटण तालुक्यातील धबधबा तसेच सज्जनगड ते परळी रोपवे, घाटमाता ते हुंबरळी, जंगली जायगड आणि केमसे नाका येथे वॉकिंग ट्रॅक, शिवनेरी आणि नरनाळा किल्ल्याचा विकास, अंबाबाई देवस्तानाचा विकास, पर्यटनस्थळांच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना, औरंगाबादच्या ३ पुरातन पुलांचे नूतनीकरण यासाठी २०२०-२१ च्या वर्षासाठी १४०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. २०१९-२० अर्थसंकल्पात पर्यटनासाठी २९५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. २०१८-१९ या वर्षासाठी २२६ कोटी रुपये देण्यात आले होते. यंदा पहिल्यांदाच पर्यटनासाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

tourism ministry maharashtra tourism Maharashtra Tourism Development Corporation aurangabad aditya thackeray budget mahaaghadi sarkar महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थसंकल्प औरंगाबाद आदित्य ठाकरे महाआघाडी सरकार

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.