राज्यातील शेतकरी या वर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे पूर्ण मेटाकुटीला आलेला बघायला मिळत आहे. नैसर्गिक आपदा मुळे शेतकऱ्यांचे (Farmers) लाखोंचे नुकसान झाले आहे, मात्र यापेक्षाही मोठे संकट प्रशासनाचा (Administration) बेजबाबदारपणा आहे. मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यात अवकाळीने बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यासमवेत पूर्ण राज्यात हजेरी लावली होती या अवकाळी मुळे सर्वात जास्त नुकसान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे झाले होते. बुलढाणा जिल्ह्यात देखील या अवकाळीचा सर्वात जास्त फटका कांदा उत्पादकांनाच बसला होता. या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई म्हणुन जवळपास 8 कोटी रुपये निधी मंजूर देखील केला होता, असे असले तरी नुकसान भरपाईची रक्कम ही चिखली तालुक्यातील (Chikhli Block) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालीच नाही
जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेत दिली गेली, मात्र चिखली तालुक्यातील प्रशासनाच्या बेजबाबदार वागण्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळालेलीच नव्हती. शासनाकडून निधी हा मिळालेला असताना देखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली गेली नाही म्हणुन सरनाईक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती तसेच त्यानी यावर लवकर कार्यवाही केली गेली नाही तर ठिय्या मांडण्याचे देखील संकेत दिले होते. या अनुषंगाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढत वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
यासाठी जिल्हाधिकारी (Collector) यांनी 14 लाख (Fourteen Lakh) रुपये निधीची तरतूद देखील केली आहे. म्हणुन आता चिखली तालुक्याच्या शेळगाव, खंडाळा,अन्वी, मुंगसरी इत्यादी गावातील वंचित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. चिखली तालुक्यातील विशेषता तिल्हारी शिवारातील शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे, आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तिल्हारी शिवारात अवकाळीमुळे जास्त नुकसान झाले होते.
विशेष म्हणजे या शिवारातील पंचनामे देखील झाले होते मात्र प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे येथील शेतकऱ्यांना तब्बल 5 महिने नुकसान भरपाईची वाट बघावी लागली आहे. उशिरा का होईना पण नुकसान भरपाई दिली जाणार म्हणुन शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पण सदर प्रकरणाने प्रशासनाच्या कार्यभारावर एक मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
Share your comments