कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यातील 31 जिल्ह्यात 2021-22 व 2022-23 या दोन वर्षात सुमारे 14 हजार 141 कांदाचाळी उभाारण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी अनुदान देण्यासाठी 125 कोटी रुपयांचा निधीला राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीने मान्यता दिली आहे. सर्वाधिक चाळी ह्या अहमदनगर जिल्ह्यात होणार आहेत.
राज्यात गेल्या पाच वर्षात कांदा उत्पादनाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. गेल्या दोन वर्षात पाऊस, बदलते वातावरण व अन्न कारणाने कांदा पिकांचे नुकसान झाले. दरातही घसरण होत असते. मात्र तरीही कांदा क्षेत्र वाढू लागले आहे. क्षेत्रवाढीमुळे कांदा साठवणीची अडचण वाढ आहे. शेतकऱ्यांना कांद्याची साठवण करण्यात यावी, यासाठी कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कांदाचाळी उभारणीला साधरणपणे शेतकरी 87 हजार 500 रुपयाचे अनुदान दिले जाते.
कांद्याचे वाढते क्षेत्र पाहता कांदा चाळ उभारणीला अनुदान मिळावे यासाठी शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. दोन वर्षापासून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केले जात असल्याने कांदाचाळीसाठी अनुदान मिळावे, अशी मागणी करणारे शेतकरी अधिक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चार लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे अर्ज असून एकट्या नगर जिल्ह्यात आतापर्यत 88 हजार शेतकऱ्यांनी अर्ड केले आहेत. कांदा चाळीची मागणी अधिक असतानाही गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गाच्या संकटामुळे निधी उपलब्ध करण्याला अडचणी आल्या होत्या. यंदा मात्र चाळ ुभारणीला चांगला निधी मिळाला आहे.
राज्यातील 31 जिल्ह्यात दोन वर्षा सुमारे 14 हार 141 कांदाचाळी उभारण्याचे निश्चिच केले आहे. त्यासाठी अनुदान देण्यासाठी 125 कोटी रुपयांच्या निधीला राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीने मान्यता दिली आहे.
Share your comments