1. बातम्या

Pune Ring Road : पुणे रिंगरोडच्या भूसंपादनास 12 हजार शेतकऱ्यांची संमती, या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला सर्वाधिक मोबदला

Pune Ring Road :- पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पुणे शहराच्या सभोवती जो काही रिंगरोड बांधला जात आहे त्याला आता गती मिळणार आहे. या रिंग रोडचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग करण्यात आले असून यातील पश्चिम भागातील जमिनीच्या संपादनाला आता वेग येणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
pune ring road map

pune ring road map

Pune Ring Road :- पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पुणे शहराच्या सभोवती जो काही रिंगरोड बांधला जात आहे त्याला आता गती मिळणार आहे. या रिंग रोडचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग करण्यात आले असून यातील पश्चिम भागातील जमिनीच्या संपादनाला आता वेग येणार आहे.

कारण पश्चिम भागातील जवळजवळ  चार तालुक्यातील बारा हजार 166 शेतकऱ्यांनी या रिंगरोडसाठी जमीन देण्याकरिता संमती दिली असून आतापर्यंत संपादित करण्यात आलेल्या 85 हेक्टर जमिनीला मोबदल्यापोटी 491 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप देखील करण्यात आले आहे. एवढेच नाही तर या महिन्याच्या शेवटपर्यंत एक हजार कोटींचा मोबदला भूसंपादनाकरिता देण्याचे देखील नियोजन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 491 कोटींचा मोबदला

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे शहराच्या सभोवती बांधण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या पश्चिम भागातील आवश्यक जमिनीच्या संपादनाला आता गती मिळाली असून सुमारे 12,166 शेतकऱ्यांनी याकरिता आवश्यक भूसंपादनाला संमती दिली आहे. पैकी 85 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले असून त्या जमिनीला मोबदल्यापोटी तब्बल 491 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे. एवढेच नाही तर या महिन्याच्या अखेरपर्यंत  भूसंपादनाकरिता 1000 कोटींचा मोबदला देण्याचे नियोजन देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 चार तालुक्यातील किती जमिनीची आहे आवश्यकता?

 याकरिता आवश्यक भूसंपादनासाठी मावळ, मुळशी, भोर आणि हवेली या चार तालुक्यातील 35 गावांमधून भूसंपादनाकरिता 2455 गटातील जमिनीची आवश्यकता आहे. या चारही तालुक्यातील सुमारे 16,940 शेतकऱ्यांकडे 738.64 हेक्टर एवढी जमीन आहे. यापैकी 1775 गटांमधील 12,166 शेतकऱ्यांनी 491.742 हेक्टर क्षेत्र देण्याला संमती दिलेली आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील 38 आणि हवेली तालुक्यातील 34 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

 तालुकानिहाय मोबदल्याचे वाटप

रिंगरोडकरिता आवश्यक भूसंपादनासाठी ज्या शेतकऱ्यांनी संमती दिली आहे अशा शेतकऱ्यांपैकी २३९ गटातील 194 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया मावळ, मुळशी व भोर तसेच हवेली तालुक्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली असून आतापर्यंत सुमारे 85 हेक्टर जमीन संपादित करून त्याकरिता आवश्यक 491 कोटी रुपयांचा मोबदला वाटप केला आहे. यामध्ये सर्वाधिक मोबदला मावळ तालुक्याला म्हणजेच 218 कोटी 61 लाख, मुळशी तालुक्याला 94 कोटी 33 लाख, हवेली तालुक्यात 149 कोटी तर भोर तालुक्यात 28 कोटी 57 लाख रुपये देण्यात आले आहेत.

English Summary: 12 thousand farmers consented to the land acquisition of Pune Ring Road Published on: 25 August 2023, 09:43 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters