अनेक घडामोडींनंतर अखेर शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, यामध्ये अनेक जुन्या नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काहींचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे आजच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना आता शिंदे गटातील 12 आमदार नाराज असून ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी केला आहे.
यामुळे आता पुन्हा हे आमदार शिवसेनेकडे जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर भाजपसोबत घरोबा करून सरकार स्थापन केलं. अखेर आज महिना उलटल्यानंतर अखेरीस विस्ताराचा निर्णय घेतला आहे. मात्र यामध्ये अनेकांना डावलले असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक जण मंत्रिमंडळात इच्छुक आहे, त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा राऊत यांनी केला. आपल्याला मंत्रिमंडळात जागा मिळावी यासाठी अब्दुल सत्तार आणि इतर आमदार जोरदार प्रयत्न करत आहे.असे १२ आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. हे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना नोटीस; राज्याच्या राजकारण खळबळ
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार . (Maharashtra Cabinet Expansion) अखेर 38 दिवसानंतर पार पडला. यामध्ये अनेकजण नाराज असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे लक्ष लागले होते, तसेच एकही महिला मंत्री म्हणून याठिकाणी शपथ घेतली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या;
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
ब्रेकिंग! बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीशकुमार सरकार पडले, भाजपच्या 16 मंत्र्यांचा राजीनाम
अशी वाईट परिस्थिती कोणाच्या वाट्याला न येवो! पैसे नसल्याने पाकिस्तानने विकायला काढले वाघ, सिंह
Share your comments