1. बातम्या

सत्तर दिवसात कापणीला येणार ११४२ वाणाचा मूंग ; उत्पादनही वाढणार

मूंग हे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यातही घेतले जाणारे कडधान्य प्रकारातील एक पीक आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


मूंग हे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यातही घेतले जाणारे कडधान्य प्रकारातील एक पीक आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण  हरियाणा येथील कृषी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी मूंगचा नवा वाण विकसित केला आहे. हा वाण  रोगप्रतिरोधक असून उत्पादनासाठी अत्यआवश्यक असा वाण आहे.  या वाणाला एमएच ११४२ या नावाने ओळखले जाते.  हे वाण विद्यापीठाच्या  अनुवंशिकी व वनस्पती संवर्धन विभागाचा कडधान्य विभागाने विकसित केले आहे. दरम्यान या विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मूंगच्या आशा, मुस्कान, सत्या अशाप्रकारचे वाण विकसित केले आहे.

दरम्यान उत्तर - पश्चिम आणि उत्तर - पूर्वकडील मैदानाच्या भागात मूंगची एमएच ११४२ या वाणाची पेरणी करु शकतात. खरीप हंगामात या वाणाची सोप्या पद्धतीने पेरणी केली जाऊ शकते. यावेळी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, बिहार, झारखंड या परिसरात वाणाची पेरणी केली जाते.

काय आहे या एमएच ११४२ वाणाचे वैशिष्ट्ये -

या मुंगचे दाणे हे काळ्या रंगाचे असतात. या वाणाचे बिज हे मध्यम आकाराचे हिरवे आणि चमकदार असतात. या वाणाचे पीक हे गरजेपेक्षा जास्त पसरत नाही. शिवाय कापणीही सोप्या पद्धतीने केली जाते. दरम्यान या वाणाचे उत्पादन हे भौगोलिक परिस्थितीनुसार १२ ते २० क्किंटल प्रति हेक्टर होत असते. मूंगाच्या या वाणावर येलो मोझॉकसारखे रोग येत नाहीत. शेतकऱ्यांसाठी  हे वाण पुढच्या वर्षापासून उपलब्ध होणार आहेत.

English Summary: 1142 varieties of mung bean will be harvested in 70 days and production will also increase Published on: 11 September 2020, 06:09 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters