अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा हजार, ३८३ कोटी ९७ लाख, २५ हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मांडल्या. यामध्ये महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन योजनेकरिता एक हजार कोटी, ग्रामपंचायतींच्या थकीत वीजबिलापोटी महावितरणला देण्यासाठी दोन हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये पाच हजार ९७७ कोटी ४० लाख ८२ हजार रुपयांच्या महसुली लेख्यांवरील खर्चाच्या तर ४०६ कोटी ५६ लाख ४३ हजार रुपयांच्या भांडवली लेख्यांवरील खर्चाच्या पुरवणी मागण्यांचा समावेश आहे. पुरवणी मागण्यांमध्ये गृह, ग्रामविकास, सहकार, सार्वजनिक बांधकाम विभागाला झुकते माप देण्यात आले आहेत.
गृह विभाग आणि उत्पादन शुल्क विभागासाठी २ हजार ६९२ कोटी १५ लाख, चार हजार रुपयांची तरतूद केली आहे. तसेच ग्रामविकास विभागाने महावितरणला देण्यासाठी दोन हजार, २१४ कोटी, ७२ लाख ८१ हजार, सहकार व पणन विभागाला एक हजार ३३४ कोटी, ९६ लाख, ३६ हजार रुपयांची तरतूद केली आहे. हिवाळी अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या.
अँपल बोर लागवडीपासून कोट्यवधी कमाई, अनेक शेतकरी झाले मालामाल..
या अधिवेशनात सहा हजार ३८३ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. यामध्ये कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानासाठी एक हजार १४ कोटी रुपये येणार आहेत. तर वस्त्रोद्योग धोरणांतर्गत प्रकल्पांना व्याज अनुदानाऐवजी भांडवली अनुदानासाठी १०० कोटी, भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांची देणी आणि थकबाकीसाठी २२० कोटी, ९६ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांना आज मिळणार पीएम किसान योजनेतील १३ वा हप्ता
राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीज बिलांची महावितरणकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. या थकबाकीपोटी महावितरणला २ हजार २१४ कोटी, ७२ लाख ८० हजार रुपये देण्यात येणार आहेत. पुरवणी मागणीतून ही थकबाकी भरून काढण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही थकबाकी होती.
एसटी महामंडळाला २६७ कोटींचे अर्थसाहाय्य : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आणि देण्याचा विषय प्रलंबित आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये एसटी महामंडळाला विशेष अर्थसहाय्यापोटी २६७ कोटी ७२ लाख रुपयांची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या;
सांगलीतील बाहुबली कांदा ठरतोय चर्चेचा विषय! एकाच कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो...
शेतकऱ्यांचे यांत्रिकीकरण आहे गरजेचे
एका वेळेस 80 फळे आणि 80 वर्षांसाठी नफा, नारळाची शेती आहे खूपच फायदेशीर
Share your comments