ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी माजी खासदार शेतकरी नेते राजू शेट्टी शेट्टी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारच्या इथेनॉल खरेदीच्या धोरणामुळं ऊसाची FRP देऊनही साखर कारखान्यांकडे अतिरिक्त पैसे शिल्लक राहतात. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागील वर्षासह या वर्षीच्या FRP बरोबर अधिकचे 200 रुपये द्यावेत अशी मागणी लावून धरली आहे.
असे असताना कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना FRP पेक्षा अधिक 100 रुपये देण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले आहेत. यामुळे राज्य सरकारचे आता तरी डोळे उघडणार का? असा सवाल शेट्टींनी केला आहे. केंद्र सरकारच्या प्रचलित इथेनॉल (Ethanol) खरेदीच्या धोरणामुळं ऊसाची FRP देऊनही साखर कारखान्यांकडे अतिरिक्त पैसे शिल्लक राहतात.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मागील वर्षासह या वर्षीच्या FRP बरोबर अधिकचे 200 रुपये द्यावेत, अशी मागणी सातत्यानं लावून धरली होती. मात्र, सरकारनं अद्याप याबबात कोणताही निर्णय घेतला नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. FRP व्यतिरिक्त इथोनॉलचा लाभ शेतकऱ्यांना देण्याचा हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं कर्नाटकचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितलं आहे.
आज ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा, शेतकरी चिंतेत..
तसेच इथेनॉल विक्रीतून आलेली अधिकची रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळं आता शेतकऱ्यांना प्रतिटन 3 हजार 100 रूपये मिळू शकतात. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या रकमेमुळं कर्नाटकातील शेतकऱ्यांना 204 कोटी रुपये अधिक मिळतील.
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, छातीला लागला मार
कर्नाटक हे FRP पेक्षा अधिक दर देणारं देशातील पहिलं राज्य असल्याचा दावा मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी केला आहे. यामुळे त्याठिकाणी पैसे मिळत असतील तर आपल्या राज्यात का नाहीत, असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
या गावात ३०० वर्षांपूर्वीची परंपरा, मातीची घरे आणि चुलीवरचा स्वयंपाक, संपूर्ण गावात एकच फोन..
कर्जत- जामखेडमध्ये रोहित पवार की राम शिंदे? कार्यकर्त्यांने लावली 1 लाखाची पैज, चेकही केला जमा
भाजीपाल्याचे दर पडले, शेतकरी आर्थिक अडचणीत
Share your comments