राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजची घोषणा मुख्य मंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ही घोषणा केली.
त्यानुसार पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामध्ये 55 लाख हेक्टर होऊन अधिक क्षेत्र बाधित झाले होते तसेच शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता दहा हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ही मदत पुढील प्रमाणे आहे
- जिरायती साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर
- बागायती क्षेत्रासाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
- बहुवार्षिक पिकांसाठी पंचवीस हजार रुपये प्रतिहेक्टर
- ही मदत दोन हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.
यामध्ये जिरायती साठी केंद्र सरकारचे सहा हजार 800 रुपयांच्या मदतीचे निकष असले तरी राज्य सरकारने यासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Share your comments