यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळेराज्यात शेतकऱ्यांच्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या सगळ्या नुकसानी मध्ये नाशिक जिल्ह्यातही फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते
या झालेल्या नुकसान भरपाईपोटी शासनाने आतापर्यंत एक लाख 58 हजार शेतकऱ्यांच्या म्हणजेच 84 टक्के बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर कोटी रुपये वितरितकेले आहे.
यावर्षी नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर पूर्ण नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. या पूर्ण पावसाच्या कालावधीत ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनेफार नुकसान केले.नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांची पैकी मालेगाव,नांदगाव,सुरगाणा,त्र्यंबकेश्वर,इगतपुरी,पेठ येवला व निफाड या नऊ तालुक्यांमध्ये शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदेशानुसार नुकसानग्रस्त गावांमध्ये पंचनामे करण्यात आले.तब्बल दोन लाख 26 हजार 26 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे यामध्ये स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत करून दिलासा द्यावा यासंबंधीची विनंती नाशिक जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला केली होती.त्या अनुषंगाने 120 कोटी 24 लाख सात हजार रुपये एवढी मदत बाधित शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.या मंजूर निधी मधून राज्य सरकारनेदिवाळी कालावधीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधीपाठवला असून या निधीचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
या अनुषंगाने आतापर्यंत जवळजवळ एक लाख 58 हजार एकशे पाच जणांना 100 कोटी 89 लाख 51 हजार 850 रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैकी 83.91 टक्के शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे
Share your comments