1. बाजारभाव

Tur Production : तुरीच्या दरात नरमाई; आयातीचा फटका, जाणून घ्या आजचे दर

Tur Price : मागील वर्षीच्या बुरशीजन्य आजार आणि अतिपावसामुळे तूर उत्पादनात घट निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात तुरीला चांगला दर मिळाला. तर काही ठिकाणी तुरीने ७ हजार ते १४ हजार रुपयांचा प्रतिक्विंटल टप्पा गाठला होता. यामुळे दरात तेजी निर्माण झाली आणि डाळीचे दर वाढले. पण सध्या तुरीचे दर कमी झाल्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी आहे.

Tur Production News

Tur Production News

Tur Rate Update News : तूर डाळीच्या वाढलेल्या दरात नरमाई आली आहे. केंद्र सरकारने वाढलेल्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी तूर आयात केली आहे. यामुळे दरात नरमाई निर्माण झाली आहे. प्रतिकिलो १७० किलो असणारी तूर डाळ आता १३० रुपयांवर आल्याने सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे तूर उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मागील वर्षीच्या बुरशीजन्य आजार आणि अतिपावसामुळे तूर उत्पादनात घट निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारात तुरीला चांगला दर मिळाला. तर काही ठिकाणी तुरीने ७ हजार ते १४ हजार रुपयांचा प्रतिक्विंटल टप्पा गाठला होता. यामुळे दरात तेजी निर्माण झाली आणि डाळीचे दर वाढले. पण सध्या तुरीचे दर कमी झाल्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संकेतस्थळानुसार आज (दि.६) रोजी राज्यातील बाजार समितीत ४ हजार ८७० क्विंटल तुरीची आवक झाली आहे. तर आज लातूर बाजार समितीत तुरीला कमीत कमी ८ हजार ४०० रुपये, जास्तीत जास्त ८ हजार ८०० आणि सर्वसाधारण दर ८ हजार ६०० रुपये मिळाला.

चालू हंगाम अर्थातच २०२३-२४ साठी केंद्र सरकाने तुरीला किमान आधारभूत किंमत ७ हजार प्रतिक्विंटल रुपये जाहीर केली आहे. तर मागील वर्षी ही किंमत ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल होती. तर गतवर्षीच्या तुलनेत या हंगामासाठी तूर दरात ४०० रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे.

सध्या खरीप हंगामातील तूर बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. पण केंद्र सरकारने तूर आयात केल्यामुळे त्याचा परिणाम बाजार समितीतील तूर दरावर झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकरी आधीपासून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडले आहेत. त्यात आता पुन्हा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांची अधिक चिंता वाढली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संकेतस्थळानुसार (दि.06-01-2024)
जिल्हा - जात/प्रत- आवक-कमीत कमी दर-जास्तीत जास्त दर-सर्वसाधारण दर
अहमदनगर - नं. १- 250-8000- 8600-8000
अहमदनगर-पांढरा-300-8200-8300-8200
अकोला- लाल- 698- 6800-9320-8550
बुलढाणा-लाल- 467- 7000-8700-7500
धाराशिव-पांढरा- 45-8000- 8501-8450
धाराशिव-गज्जर-1001-8000 -9071-8536
हिंगोली-लाल- 40-7000-7500-7300
हिंगोली-गज्जर-100-7399-8251- 7825
जालना-लाल-28 -7850-8300-8100
जालना-पांढरा -33- 7900-8300-8200
लातूर -लाल -339 -8400-8801-8600
लातूर -पांढरा-444-8401-8825-8613
नागपूर- लोकल-3-7010-7300-7150
नागपूर-लाल-101-7751-8615-8399
वर्धा-लाल-81-7000-7900- 7800
वाशिम- --640-7190-9155-8355
वाशिम- लाल-300-7350-8400-7800

English Summary: Tur Production Moderation in Tur prices Import know today rates Published on: 06 January 2024, 04:20 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters