Soybean Price : सध्या राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक कमी प्रमाणात होताना दिसत आहे. तर या सोयाबीनला राज्यात ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. आज (दि.२२) रोजी बुलढाण्यात सर्वात जास्त अर्थातच ७५६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या सोयाबीनला कमीत कमी ४१६० रुपये क्विंटलचा तर जास्तीत जास्त ४ हजार ४१० रुपये क्विंटलचा दर तर सरासरी दर ४ हजार २८५ रुपये क्विंटलचा मिळाला आहे.
आज राज्यात सोयाबीनची एकूण २ हजार ४२६ क्विंटल आवक झाली आहे. तर यवतमाळमध्ये ५९० क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून याला सरासरी ४ हजार ४३२ तर कमीत कमीत ४ हजार ३९२ तर जास्तीत जास्त ४ हजार ४७५ रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. तर केंद्र सरकारने यंदा सोयाबीनची आधारभूत किंमत ४ हजार ६०० रुपये क्विंटल जाहीर केली आहे.
खरीपात सोयाबीन बियाण्यांची मागणी वाढण्याची शक्यता
दरम्यान देशातील रब्बी हंगाम संपला असून आता शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. तसंच मागील वर्षी देखील सोयाबीनचे उत्पादन पावसाअभावी घटले होते. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी सोयाबीन राखीव ठेवले आहे. तसंच बियाणे म्हणून सोयाबीन विकल्यास शेतकऱ्यांना त्यातून चांगला आर्थिक फायदा मिळतो.
Share your comments