Soybean Price : सोयाबीनच्या दराचा मुद्दा काही दिवसांपासून पुन्हा एकदा समोर आला आहे. देशासह राज्यात सोयाबीनला किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमीचा दर मिळत असल्याचं दिसून आलं आहे. देशात सोयाबीनला ४ हजार १०० ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळत आहे.
मध्यप्रदेश राज्यात सोयाबीनला सरासरी ४ हजार २०० ते ४ हजार ७३० रुपये प्रतिक्विंटलला मिळाला आहे. सर्वात जास्त ४ हजार ७३० रुपये प्रतिक्विंटलला दर ताराना बाजार समितीत मिळाला आहे. तर कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर देखील ४ हजार ७०० रुपयांचा जवळच राहीलेत.
महाराष्ट्रात सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ५८० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला आहे. सर्वात जास्त ४ हजार ५८० रुपये प्रतिक्विंटलला दर लातूर बाजार समितीत मिळाला आहे. येथे कमीत कमी ४ हजार ४९४ तर जास्तीत जास्त दर ४ हजार ७६१ रुपये प्रतिक्विंटलला मिळाला आहे.
गुजरात राज्यात सोयाबीनला सरासरी ४ हजार १२८ ते ४ हजार ४०० रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे. तर सर्वांत जास्त ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर राजकोट जिल्ह्यातील जेटपूर बाजार समिती मिळाला आहे. कमीत कमी कमी दर ४ हजार रुपये मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर ४ हजार ४५५ रुपये प्रतिक्विंटलला मिळाला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने २०२३-२४ साठी सोयाबीनची आधारभूत किंमत ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे. तरी देखील देशाभरातील बहुतांश बाजार समितीत सोयाबीनची खरेदी ही आधारभूत किमतीच्या खालीच केली जात आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
Share your comments