सोयाबीन खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. सोयाबीन या नगदी पिकाची शेती बऱ्याच शेतकऱ्यांना लाभदायक ठरत आहे. सोयाबीनचे बाजार भाव विषयी आपण जाणून घेऊया.
सध्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) सोयाबीनची चार हजार क्विंटल आवक नमूद करण्यात आली आहे. या बाजार समितीत जास्तीत जास्त बाजार भाव 5 हजार 910 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. तर सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 840 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे.
Eknath Shinde: शेतकऱ्यांना सप्टेंबरपासून 50 हजारांचे अनुदान मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 239 क्विंटल सोयाबीनची (quintal of soybeans) आवक झाली. आज या बाजारात सोयाबीनला कमीत कमी 4 हजार रुपये तर जास्तीत जास्त बाजार भाव 5 हजार 825 रुपये तर सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 619 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळत आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल 780 क्विंटल सोयाबीनची (soyabean) आवक झाली. याठिकाणी 5 हजार 300 रुपये प्रति क्विंटल कमीत-कमी बाजार भाव मिळाला तर जास्तीत जास्त बाजारभाव 5 हजार 950 आणि सर्वसाधारण बाजार भाव 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला.
केज कृषी उत्पन्न बाजार समिती
केज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Cage Agricultural Produce Market Committee) काल संध्याकाळपर्यंत 255 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 5850 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून जास्तीत जास्त बाजार भाव 6 हजार रुपये तसेच सर्वसाधारण बाजारभाव 5 हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
Sanen Goat: जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी ठरतेय अव्वल; पालनातून शेतकऱ्यांना मिळणार चांगले उत्पादन
Sanen Goat: सानेन शेळीच्या पालनाने शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; फक्त 'ही' काळजी घ्या
Weekly Horoscope: हा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा ठरेल? वाचा तुमचे राशीभविष्य
Share your comments