Vashi APMC News : फळांचा राजा बाजार येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आंबा प्रेमी आता आंबा खाण्याचा आनंद घेत आहेत. नवी मुंबईतील वाशी बाजार समितीत आता हापूस आंब्याची आवक सुरु झाली आहे. या आंब्याला बाजार समितीत ७ हजार ते १२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. बाजार समितीत कोकणातून आंब्याची आवक सुरु आहे.
सध्या आंब्याचा हंगाम सुरु झालेला नाही. मात्र आता काही अंशी बाजारात आंबा येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन यांच्या संकेतस्थळावर आज (दि.२९) रोजी १७६ क्विंटल आंब्याच्या आवकेची नोंद करण्यात आली आहे. या आंब्याला कमीत कमी ८ हजार रुपयांचा दर आहे. तर जास्तीत जास्त १४ हजार रुपये दर मिळत आहे. तर सरासरी दर ११ हजार रुपये मिळत आहे.
राज्यात सर्वात जास्त आंबा कोकणात पिकतो. कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे हा आंबा बाजार देखील लवकर येतो. त्यामुळे जानेवारी महिन्यात कोकणचा हापूस बाजार येतो. आता बाजार समितीत येत असलेल्या आंब्याला सध्या चांगला दर मिळत आहे.
वाशी बाजार समितीत यंदा जानेवारी महिन्यातच आंबा आवक सुरु झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही आंबा आवक वाढण्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्यात बाजार सर्वत्र आंबा उपलब्ध असेल आणि तो सर्वसामान्य ग्राहकांना खाण्यास परवडेल. सध्या आंब्याला चांगला दर म्हणजे ७ ते १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यामुळे सध्या या आंब्याची चव मोजकेच लोक चाखत आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत आहे. मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक देशभरात होते. तेव्हा बाजार आंब्याचे दर कमी राहतात. आणि एप्रिलमधील आंबा परिपूर्ण पिकलेला असतो त्यामुळे सर्वचजण एप्रिलमध्ये आंबा खाण्यास प्राधान्य देतात. तसंच आंबा पिकाला पुढे हंगामात चांगलं पीक येऊन सुगीचे दिवस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Share your comments