1. बाजारभाव

Mango Rate : फळांचा राजा पुण्यात दाखल, २१ हजार रुपयांला पेटीची बोली

Mango season : पुणे बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. यावेळी या पहिल्या पेटीची पूजा करण्यात आली. तर या मानाच्या पहिल्या पेटीला २१ हजार रुपये दर मिळाला आहे. बाजारात लिलाव सुरु झाल्यानंतर या पेटीचा देखील लिलाव करण्यात आला. त्यात सर्वाधिक लिलाव बोली बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्याने लावून ही मानाची पेटी विकत घेतली.

Mango season news

Mango season news

Pune Mango News : आंब्याचा सिजन आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे आता सर्वांना आतुरता आहे ती खास आंब्याची. आंब्याच्या हंगामात केशस, हापूस, लालबाग असे विविध आंबे बाजारात दाखल होतात. त्यामुळे प्रत्येक आंबा प्रेमी आपआपल्या परिने आवडतीचे आंबे खातात. तर काल (दि.१८) रोजी पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. यामुळे आता हळूहळू बाजारात आंबे दाखल होतील, अशी आशा सर्वांना लागली आहे.

पहिल्या पेटीचा दर २१ हजार रुपये

पुणे बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. यावेळी या पहिल्या पेटीची पूजा करण्यात आली. तर या मानाच्या पहिल्या पेटीला २१ हजार रुपये दर मिळाला आहे. बाजारात लिलाव सुरु झाल्यानंतर या पेटीचा देखील लिलाव करण्यात आला. त्यात सर्वाधिक लिलाव बोली बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्याने लावून ही मानाची पेटी विकत घेतली. या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत. पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणली होती.

पुणे मार्केट यार्डात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. त्याला सर्वाधिक २१ हजार रुपयांचा दर मिळाला. या पेटीत ४८ आंबे आहेत. अर्थातच ही पेटी ४ डझनची आहे. यामुळे एका आंब्याची किमत ४४० रुपये ठरली आहे.

आंब्याला सध्या पोषक वातावरण

आंब्याला सध्या पोषक वातावरण आहे. तसंच परदेशाच आंबे पाठवण्यासाठी शेतकरी आधीच काही आंबे तयार करुन ठेवतात. त्यामुळे काही बाजार समितीत जानेवारीत आंब्याची पेटी दाखल होती. या पेटीला मानाचा आंबा मानला जातो. त्यामुळे या आंब्याला खरेदीसाठी चांगली बोली लागली जाते.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात देवगडचा हापूस पहिल्यांदा दाखल झाला होता. मात्र यंदाच्या आंब्याला बदलत्या हवामानाचा फटका बसल्याचे पाहायला मिळत नाही. अशीच स्थिती राहिल्यास मार्चनंतरच हापूस आंब्याची आवक होईल, असे घाऊक व्यापारी सांगतात.

English Summary: Mango rate update mango entered in pune mango season news Published on: 19 January 2024, 12:21 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters