तूर उत्पादकांसाठी (Tur producer) ही महत्वाची बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून तुरीचा भाव बाजारात चांगलाच वाढत होता. अन्य कृषी मालापेक्षा तुरीला सर्वाधिक भाव मिळत होता, परंतु आता वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.
हा भाव 8400 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. मात्र सध्याचे बाजारभाव बघता तुरीच्या भावात बरीच घट झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काल सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तुर बाजारभावानुसार (Tur Market Price) तुरीला सर्वाधिक 7 हजार 905 रुपयांचा दर मिळालेला आहे.
हा दर अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून याठिकाणी 452 क्विंटल तुरीची (Tur Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 6000 हजार कमाल भाव 7 हजार 905 आणि सर्वसाधारण भाव 7 हजार 400 रुपये इतका मिळाला.
Soybean Market Price : सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; सोयाबीन विकला जातोय 'या' दराने
तर सर्वाधिक आवक ही वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 1900 क्विंटल इतकी झाली. मात्र काल सायंकाळीचे दर पाहून आज तुरीला किती दर मिळेल? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून आजचे दर जाणून घरून तूर बाजारात न्यावा.
महत्वाच्या बातम्या
Poultry Farming: 250 अंडी देणारी प्लायमाउथ रॉक कोंबडी पाळा; कमी खर्चात मिळणार जास्त नफा
Maize Rate: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; मक्याचे दर तेजीत, मिळतोय 'इतका' दर
Red Kandhari: पशूपालकांचे दूध उत्पन्न वाढणार; 'लाल कंधारी' गाय 275 दिवस देते दूध
Share your comments